शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

तात्पुरते अतिक्रमण काढून घ्या; महिनाभराने पुन्हा या...!

By admin | Updated: February 27, 2017 01:04 IST

कर्मचाºयांकडून अतिक्रमणधारकांना ‘कानमंत्र’ : महामार्गावरील अतिक्रमणांवर आज कारवाई

जळगाव: महामार्गाच्या समांतर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मनपा व राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सोमवार, २७ फेब्रुवारी पासून दोन दिवस राबविली जाणार आहे. मात्र किरकोळ वसुली करणाºया मक्तेदाराच्या कर्मचाºयांकडून या अतिक्रमणधारकांना तात्पुरते अतिक्रमण काढून घ्या, महिनाभरानंतर वातावरण थंड झाले की, पुन्हा या, असा कानमंत्र दिला जात आहे.  त्यामुळे काही अतिक्रमणधारकांनी महामार्गापासून काही अंतरावर आपले साहित्य हलविल्याचे चित्र ‘लोकमत’ने रविवारी सायंकाळी केलेल्या पाहणीत दिसून आले. अनेकांनी आधीच केले स्थलांतरवसुली कर्मचाºयांकडून मिळालेला सल्ला ऐकून आयटीआयच्या भिंतीलगतच्या काही परप्रांतीय विक्रेत्यांनी त्यांचे रहिवासी शेड काढून स्वयंपाकाचे व दैनंदिन वापराचे सामान लगतच्या मोकळ्या जागेत नेऊन टाकले आहे. तेथेच मोकळ्या जागेत महिनाभर वास्तव्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोमवारी कारवाई सुरू होताच विक्रीसाठी आणलेले सोफे, क्रिकेट बॅट आदी साहित्यही या मोकळ्या जागेत नेऊन ठेवले जाणार आहे. महिनाभरानंतर पुन्हा याच जागेवर पुन्हा व्यवसाय करण्याची तयारी आहे. तर काही विक्रेत्यांनी महिना-दोन महिने अन्य जिल्ह्यात जाऊन पुन्हा परत येण्याची तयारी केली आहे. तर               काही टपरीधारकांनी त्यांच्या टपºया आधीच समांतर रस्त्यापासून काही अंतरावर आतील बाजूस नेऊन ठेवल्या. अतिक्रमण रोखण्याचे आव्हानअतिक्रमण धारकांकडून मोहीम थंडावताच पुन्हा अतिक्रमण करण्याची तयारी सुरू असल्याने ‘नही’ व मनपासमोर हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना राबविण्याचे आव्हान आहे. या रस्त्याच्या जागेवर सातत्याने मोहीम राबवावी लागणार आहे. आज सकाळी ७ वाजेपासून कारवाई मनपा व रा.म.प्रा. तर्फे पोलिसांच्या सहकार्याने सोमवारी सकाळी ७ वाजेपासून या अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. दोन दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचा विकास करण्यात आलेला नसल्याने नागरिकांना या महामार्गावरूनच ये-जा करावी लागत असून त्यामुळे अपघात होऊन निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे तातडीने या समांतर रस्त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. ५५ कर्मचारी, ६ अधिकारी व ५ ट्रॅक्टरमनपाने या समांतर रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांच्यासह बांधकाम विभागाचे ५ अभियंते तसेच बांधकाम विभागाचे ५ ट्रॅक्टर व त्यावर प्रत्येकी तीन मजूर तसेच अतिक्रमण विभागाचा ट्रक व ४० कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. ७० पोलीस कर्मचारी व १० अधिकारी नियुक्तअतिक्रमण निर्मूलनसाठी जिल्हा पेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका व रामानंद नगर पोलीस स्टेशनमधून सोमवारी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी रविवारी संध्याकाळी बंदोबस्ताचे नियोजन करुन प्रभारी अधिकाºयांना सूचना केल्या. सांगळे हे स्वत: मोहीम राबविताना महामार्गावर थांबणार आहेत. अतिक्रमण हटविण्यासाठी ७० पोलीस कर्मचारी व १० अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.