शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातल्या 'या' शहरात आहे चक्क स्मशानभूमीत सिद्धीविनायकाचं मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 14:24 IST

तापी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. या मंदिराला सुमारे 100 वर्षांची परंपरा लाभली आहे.

प्रशांत भदाणे

जळगाव - आजवर तुम्ही गणरायाची अनेक मंदिरं पाहिली असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा गणपती मंदिराची माहिती सांगणार आहोत, ज्या बद्दल तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. हे मंदिर अशा ठिकाणी उभारण्यात आलंय, ज्याठिकाणी लोक दिवसाही जायला घाबरतात... ते ठिकाण म्हणजे स्मशान. जळगावात एक गणपती मंदिर चक्क स्मशानभूमीत आहे. 

जळगाव जिल्ह्यातलं भुसावळ शहर रेल्वेचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. या शहरात यावल रस्त्यावर तापी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. या मंदिराला सुमारे 100 वर्षांची परंपरा लाभली आहे. या मंदिरातली गणेशमूर्ती स्वयंभू आहे. ही मूर्ती तापी नदीच्या पाण्यात वाहून आली होती. काही स्थानिक लोकांनी या मूर्तीची नदीकाठी स्मशानभूमीतच चिंचेच्या झाडाखाली प्रतिष्ठापना केली होती. 

सुरुवातीला याठिकाणी  छोटं मंदिर होतं. पण कालांतराने सिद्धिविनायकाची महती वाढली आणि मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आता याठिकाणी भव्य मंदिर आहे. एरवी स्मशानभूमीत महादेवाचं मंदिर असल्याचं पाहायला मिळतं. पण भुसावळला असलेलं सिद्धिविनायकाचं मंदिर हे त्याला अपवाद आहे. या मंदिरातल्या गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये देखील तितकीच खास आहेत. राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी येतात. चतुर्थी, अंगारकी तसंच गणेशोत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी असते. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव