शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार निर्मितीत टेलिकॉमची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:00 IST

टेलिकॉममुळे रेल्वेची तिकिटे, जन्म प्रमाणपत्रे, तक्रारी आॅनलाइन नोंदणे, आॅनलाइन बँकिंग सेवा, विविध उपयोगितांसाठी बिलांची अदा करणे इ. गेल्या दोन वर्षांत बहुतेक सेवा मोबाइल फोनवर येत आहेत कारण टेलिकॉम क्षेत्राची घोडदौड जोमाने सुरू आहे. शेतीपासून उत्पादन क्षेत्रापर्यंत आणि शिक्षणापासून सरकारी यंत्रणेपर्यंत सर्वच क्षेत्रांत टेलिकॉम निर्णायक भूमिका बजावत आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांनी १७ मे ‘जागतिक दूरसंचार दिना’निमित्त श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागात आयोजित तज्ज्ञ प्राध्यापकांच्या बैठकीत दिली.

ठळक मुद्देतज्ज्ञ प्राध्यापकांच्या बैठीत प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांचे मार्गदर्शनजागतिक दूरसंचार दिनानिमित्त कार्यक्रम

भुसावळ, जि.जळगाव : टेलिकॉममुळे रेल्वेची तिकिटे, जन्म प्रमाणपत्रे, तक्रारी आॅनलाइन नोंदणे, आॅनलाइन बँकिंग सेवा, विविध उपयोगितांसाठी बिलांची अदा करणे इ. गेल्या दोन वर्षांत बहुतेक सेवा मोबाइल फोनवर येत आहेत कारण टेलिकॉम क्षेत्राची घोडदौड जोमाने सुरू आहे. शेतीपासून उत्पादन क्षेत्रापर्यंत आणि शिक्षणापासून सरकारी यंत्रणेपर्यंत सर्वच क्षेत्रांत टेलिकॉम निर्णायक भूमिका बजावत आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांनी १७ मे ‘जागतिक दूरसंचार दिना’निमित्त श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागात आयोजित तज्ज्ञ प्राध्यापकांच्या बैठकीत दिली.५ जी तंत्रज्ञान व आर्टिफिशयल इंटिलीजन्सवर प्राध्यापकांची कार्यशाळा होणार आहे. ५ जी तंत्रज्ञानात वापरली जाणारी अत्याधुनिक साधन सामग्री व त्यांचा वापर यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापकांना शिकवला जाणार आहे.टेलिकॉम क्षेत्रात २० लाख रोजगार उपलब्धप्राचार्य सिंह पुढे म्हणाले की, भारताची मोठी लोकसंख्या आणि स्मार्टफोनचा वाढत असलेला प्रभाव यामुळे भारतातील टेलिकॉम बाजारपेठ ही या क्षेत्रासाठी जगातील सर्वांत मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. आपल्याजवळ असलेला फोन हा केवळ संपर्क करण्याकरिता नव्हे, तर माहितीचे एक मोठे साधन म्हणून समोर आले आहे. यापुढे जाऊन अनेक उद्योगांच्या सेवा स्मार्टफोनवर अवलंबून आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम क्षेत्रात पुढील दोन वर्षात २० लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे अहवाल विविध संस्थांनी दिले आहे. टेलिकॉमचा प्रभाव हा असाच वाढत जाणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना या क्षेत्रात रोजगारक्षम बनवण्याची तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागाचे प्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक साकळे, प्रा.धीरज पाटील, नितीन पांगळे यांनी सहभाग नोंदवला.'एआय'ची गरजडॉ.गिरीश कुळकर्णी म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा प्रभाव बिग डेटा, मशिन लर्निंग, कम्प्युटिंग पॉवर, स्टोअरेज कपॅसिटी, क्लाउड कम्प्युटिंग यामुळे लक्षणीय वाढला असून, आरोग्यसेवा, शिक्षण, अर्थ उद्योग, शेती आणि दळणवळण या क्षेत्रांना याचा मोठा लाभ होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात भारताची सुरुवात झाली असून, चीन व अमेरिकेची बरोबरी करणे आव्हानात्मक ठरेल. मात्र, आपण आपलाच विचार केला, तर पीक व्यवस्थापन, पर्यावरण, राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांवर मोठा व सकारात्मक प्रभाव पडेल. यासाठी गुणवत्तापूर्ण डेटा, कुशल मनुष्यबळ व योग्य तंत्रज्ञान याची गरज लागेल आणि हे खूप कमी वेळात आपल्याला करणे गरजेचे आहे. म्हणूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेबाबत पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ