कोरोनामुळे तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 06:16 PM2021-01-25T18:16:27+5:302021-01-25T18:16:33+5:30

रावेर तहसील कार्यालय ‘वार्‍यावर’

Tehsildar and resident deputy tehsildar on leave due to corona | कोरोनामुळे तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार रजेवर

कोरोनामुळे तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार रजेवर

Next
ावेर : तहसीलदार उषाराणी देवगुणे व निवासी नायब तहसीलदार सी. जे. पवार हे कोरोना बाधित झाल्याने त्यांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. निवडणूक नायब तहसीलदार देशमुख व संगांनियो नायब तहसीलदार मनोज खारे हे सुध्दा वैद्यकीय रजेवर असल्याने तहसील कार्यालय अव्वल कारकूनांच्या हवाली करण्यात आले आहे. यामुळे तहसील कार्यालय वार्‍यावर सुटल्याची आजची बिकट परिस्थिती होती. तथापि प्रभारी तहसीलदार म्हणून संजय तायडे यांची नियुक्ती झाली आहे. ऐनपूर ग्रा. पं. सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार व प्रचारात सहभागी झालेल्या दोन कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया आटोपते न आटोपते तोच तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या संपर्कातील घरमालक व निवासी नायब तहसीलदार सी. जे. पवार तथा त्यांचा मुलगा असे तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, निवडणूक नायब तहसीलदार कविता देशमुख व संगांनियो समिती मनोज खारे हे सुद्धा वैद्यकीय रजेवर असल्याने रावेर तहसील कार्यालय आज अव्वल कारकूनांच्या हवाली करण्यात आल्याने वार्‍यावर सुटल्याची विदारक परिस्थिती होती. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण व ग्रा पं सरपंच आरक्षण सोहळा डोळ्यासमोर असताना तहसील कार्यालयाला वाली नसल्याने जनसामान्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तत्संबंधी फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांचेशी संपर्क साधला असता,जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रभारी तहसीलदार म्हणून लवकरचं नियुक्ती होणार असल्याची पुष्टी जोडली आहे.~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~रावेर तालुक्यात आठवडेभरात ३५ कोरोना बाधित~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~रावेर शहरातील पाच रूग्णांसह तालुक्यात ३५ रूग्ण आठवडेभरात कोरोना बाधित झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील यांनी दिली. किंबहुना, नवीन तरतुदीनुसार मात्र आता गृहविलगीकरण प्रक्रिया फक्त आठवडय़ावर आली असल्याची पुष्टीही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील यांनी जोडलीसंजय तायडे प्रभारी तहसीलदारजिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे व निवासी नायब तहसीलदार सी. जे. पवार यांच्या वैद्यकीय रजा कालावधीत ५ फेब्रुवारी पर्यंत भुसावळ निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी रावेर तहसीलदार म्हणून कार्यभार सांभाळावा असे आदेश निर्गमित केले आहेत.

Web Title: Tehsildar and resident deputy tehsildar on leave due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.