शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे पथक जळगाव जिल्ह्याच्या अभ्यास दौ-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 22:44 IST

केंद्रीय सेवेतील अधिका-यांचा समावेश

ठळक मुद्दे वैजापूर व पाल येथे देणार भेटीविविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थांशी संवाद

जळगाव : भोपाळ येथील केंद्रीय प्रशिक्षण अकादमीतील अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवेच्या दहा प्रशिक्षणार्थी अधिका-यांचे पथक पाच दिवसांच्या अभ्यास दौºयासाठी मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले आहे. या दौºयात हे अधिकारी वैजापूर, ता. चोपडा आणि पाल, ता. रावेर या गावांना भेटी देऊन अभ्यास करणार आहे.या अधिकाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, भुसावळ रेल्वे परिमंडळाचे महाप्रबंधक आर. के. यादव, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह रेल्वे, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी या अधिकाºयांना जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक व प्रादेशिक माहिती दिली. सोबतच ‘बनाना सिटी’ ते ‘गोल्ड सिटी’ बाबत माहिती देऊन जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न, जिल्ह्यातील शेतीचे तंत्र, भुसावळ रेल्वे जंक्शन, वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरी, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प इत्यादींबाबत माहिती दिली. पोलीस अधीक्षक शिंदे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, हाताळण्याची पध्दती, यासाठी वापरण्यात येणारी पध्दती, गुन्हेगारी रोखण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. महाप्रबंधक यादव यांनी रेल्वे सेवेबाबतची माहिती दिली.या अधिकाºयांच्या पथकात भारतीय पोलीस सेवेतील किरण श्रृती, वाय. रिशांत रेड्डी, शेख फरीद जे., व्ही. व्ही. साई प्रनीथ, जी. कृष्णकांत, भारतीय महसूल सेवेतील प्रणव अनंत कानिटकर, सोमय्या, भारतीय वन सेवेतील व्यंकोथ चेतन कुमार, भारतीय रेल्वे वाहतूक सेवेतील अरविंद प्रदीप एस. व भारतीय माहिती व प्रसाण सेवेतील नवीन श्रीजीत यु. आर यांचा समावेश आहे.दौरा कार्यक्रमया दौ-यात या प्रशिक्षणार्थी अधिकाºयांचे प्रत्येकी पाच जणांचे दोन पथके तयार करण्यात आली आहे. एक पथक वैजापूर आणि दुसरे पथक पाल या गावांना भेटी देणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी हे अधिकारी या गावांतील तलाठी कार्यालयास भेट देणार असून याठिकाणी ते जमिनीच्या रेकॉर्डचा अभ्यास करणार आहेत. १४ नोव्हेंबर रोजी ते ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा अभ्यास करणार आहे १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती घेऊन अभ्यास करतील. १६ नोव्हेंबर रोजी प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देतील. १७ नोव्हेंबर रोजी गावातील विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव