शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी दोन महिन्यांपासून वेतनाविना!

By अमित महाबळ | Updated: May 15, 2023 23:55 IST

अमित महाबळ, जळगाव: जिल्ह्यातील नगरपालिका संचालित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. मार्च व एप्रिल ...

अमित महाबळ, जळगाव: जिल्ह्यातील नगरपालिका संचालित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. मार्च व एप्रिल २०२३ चे वेतन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. 

नगरपालिका संचालित डी. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (भुसावळ), म्युन्सिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (फैजपूर), न. पा. संचालित आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय (सावदा), नगरपालिका संचालित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (यावल) या चारही कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दोन महिन्यांच्या वेतनाअभावी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. चारही महाविद्यालयात मिळून ९० पेक्षा अधिक शिक्षक आहेत. दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने घरातील आजारपण, गृहकर्जाचे हप्ते, विमा हप्ते यासाठी तजवीज करताना शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रसंगी आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. 

हा दुजाभाव कशासाठी ?

जिल्ह्यातील इतर खाजगी संस्थांमधील शिक्षकांचे वेतन नियमित होत असताना केवळ नगरपालिका संचालित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या बाबतच दुजाभाव का अशी भावना शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे.  

गरजेपेक्षा येणारा निधी कमी

भुसावळ, फैजपूर, सावदा, यावल नगरपालिका संचालित चार उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे दरमहा वेतन करण्यासाठी ३४ लाख रुपये लागतात. प्रत्यक्षात दरमहा १० लाख रुपये मिळत आहेत. ही रक्कम पुरेशी नाही. आतापर्यंत ३० लाख रुपये जमा झाले असले तरीही त्यातून एका महिन्याचे देखील वेतन होणे शक्य नाही, अशी माहिती सूत्रांकडून  मिळाली.   

अधिकारी म्हणतात...

अनुदानाअभावी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे. शासनाकडे मागणी केली आहे. त्याची पूर्तता होताच वेतन अदा केले जाईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे वेतन पथक अधीक्षक आर. एच. शर्मा यांनी दिली.

टॅग्स :Schoolशाळा