अद्ययावत मतदार नोंदणीच्या कामांवर शिक्षकांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 06:28 PM2017-11-14T18:28:26+5:302017-11-14T18:28:48+5:30

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांची मतदार नोंदणी अद्ययावत करण्याचा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. याबाबत मंगळवारी शहरातील कांताई सभागृहात फैजपूर येथील प्रांतधिकारी थोरबोले यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आलेल्या आठ सूचनांबाबत उपस्थित शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, या सूचनांमध्ये बदल करण्याची मागणी केली. त्यावर प्रांतधिकाºयांकडून योग्य उत्तर न मिळाल्याने सर्व शिक्षकांनी या नोंदणी प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Teacher's boycott of voter registration work | अद्ययावत मतदार नोंदणीच्या कामांवर शिक्षकांचा बहिष्कार

अद्ययावत मतदार नोंदणीच्या कामांवर शिक्षकांचा बहिष्कार

Next
ठळक मुद्दे बीएलओंच्या कामासाठी सुविधा न पुरविल्याने शिक्षकांची नाराजी मागण्यापूर्ण होणार नाही तोवर बहिष्कारप्रांतधिकाºयांचा त्या आठ सूचनांना शिक्षकांकडून नाराजी

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१४-मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांची मतदार नोंदणी अद्ययावत करण्याचा सूचना निवडणूक  आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. याबाबत मंगळवारी शहरातील कांताई सभागृहात फैजपूर येथील प्रांतधिकारी थोरबोले यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आलेल्या आठ सूचनांबाबत उपस्थित शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, या सूचनांमध्ये बदल करण्याची मागणी केली. त्यावर प्रांतधिकाºयांकडून योग्य उत्तर न मिळाल्याने सर्व शिक्षकांनी या नोंदणी प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा  निर्णय घेतला आहे.   

आॅगस्ट-सप्टेंबर २०१८ मध्ये जळगाव  मनपाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांची नावनोंदणी अद्ययावत करण्याचा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता कांताई सभागृहात शहरातील मनपा शाळेचे शिक्षक, सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार होते. यावेळी प्रांतधिकारी थोरबोले उपस्थित होते.

प्रांतधिकाºयांचा त्या आठ सूचनांना शिक्षकांकडून नाराजी
प्रांतधिकाºयांनी प्रशिक्षण कार्यशाळेच्या सुरुवातीला बीएलओंना आठ सूचना देण्यात आल्या. यामध्ये अद्ययावत नोंदणी करताना सध्या मतदार यादीमध्ये नाव असलेले मतदार, १ जानेवारी २०१८ या तारखेपर्यंत १८ वयापेक्षा जास्त संभाव्य मतदार, २०१८ ते १ जानेवारी २०१९ दरम्यान १८ वर्ष पूर्ण करणारे संभाव्य मतदार, परदेशातील मतदार की ज्यांचे मतदार यादीत नाव आहे व नाव नाही. सध्याचा मतदार केंद्र संदर्भातील माहिती, पर्यायी मतदार केंद्राबाबतची माहिती व पोष्ट आॅफीस बद्दलची माहिती मिळविण्याचा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचना शिक्षकांना मान्य नसल्याची माहिती काही शिक्षकांनी यावेळी प्रांतधिकाºयांना दिली. त्यावर संतप्त प्रांतधिकाºयांनी शिक्षकांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी अशा सूचना दिल्याववादालासुरुवात झाली.

या आहेत मागण्या
निवडणूक आयोगाने बीएलओंना नावनोंदणी करण्याचा सूचना दिल्या असल्यातरी मतदारांची आॅनलाईन माहिती जमा करताना इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याबाबत कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. त्या सुविधा तत्काळ देण्यात याव्यात. तसेच आधीच आॅनलाईनच्या कामांचा दबाव शिक्षकांवर आहे. तसेच नावनोंदणी करताना एका बीएलओला ठराविक  कॉलनी, नगर किंवा परिसर देण्यात यावा. यामुळे शिक्षकांना नावनोंदणी प्रक्रिया सोपी जाईल. या मागण्यांकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केल्यास अद्ययावत मतदार नोंदणीचे कामे शिक्षक करणार नाहीत असा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

 

Web Title: Teacher's boycott of voter registration work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.