शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

वाट चुकलेल्या मुलीला टीसींच्या रूपात भेटले देवदूत, केले कुटुंबीयांच्या स्वाधीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 18:12 IST

बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावरून गर्दीमध्ये चुकून ताप्ती गंगा गाडी मध्ये स्वार झालेल्या दोन वर्षे चिमुकलीला कर्तव्यावर असणारे टीसी दादांनी माणूस की दाखवत भुसावळ स्थानकावर पालकाच्या स्वाधीन केले.

भुसावळ - बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावरून गर्दीमध्ये चुकून ताप्ती गंगा गाडी मध्ये स्वार झालेल्या दोन वर्षे चिमुकलीला कर्तव्यावर असणारे टीसी दादांनी माणुसकी दाखवत भुसावळ स्थानकावर पालकाच्या स्वाधीन केले.गाडी क्रमांक २२९४८  ताप्ती गंगा यावर कर्तव्यावर असणारे  उपतिकीट निरीक्षक अनिल सोनी व अजय खोसला हे गाडीचा कोच, क्रमांक  एस-४  ची तपासणी करत असताना दोन वर्षाची मुलगी बऱ्हाणपूर सुटल्यानंतर त्यांना दरवाज्याजवळ रडताना दिसली, मुलीस जवळ घेऊन तिला विचारणा करत असताना ती मुलगी सारखी रडत होती. संपूर्ण गाडीमध्ये प्रवाशांना मुलीची ओळख पटविण्याचा प्रयत्न , करत असताना  एका प्रवासी ने मुलीस ओळखले व सांगितले की ही मुलगी बऱ्हाणपूर वरून गाडीत चढली आहे क्षणाचाही विलंब न करता उपटिकट निरीक्षक अनिल सोनी व खोसला यांनी भुसावळ वाणिज्य नियंत्रकशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली व त्याच वेळेस बरानपुर रेल्वेस्थानकावर मुख्य तिकीट निरीक्षक शकील अहमद यांनाही भ्रमणध्वनीद्वारे चिमुकली ची माहिती देण्यात आली.मुख्य तिकीट निरीक्षक शकील अहमद यांनी बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावर दोन वर्षाची मुलगी हरवल्याची उद्घोषणा केल्यानंतर भयभीत झालेले आई-वडील धावत जात शकील अहमद यांच्याकडे गेले व ती मुलगी आमचीच आहे, ती आता कुठे आहे? कशी गेली याबद्दल चौकशी करायला लागले तिकीट निरीक्षक अनिल सोनी यांनी व्हाट्सअप वर मुलीचा फोटो पाठवायला तसेच व्हिडिओ कॉल करून दोन वर्षे चिमुकली फातिमाचाच आहे ही खातर जमा झाली. बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावर मुलीची आई मुनिरा(२४)वडील फक्रुद्दीन तांबावाला (३०) रा. मुंबई हे गाडी क्रमांक ११०७२  कामायनी गाडीने मुंबईकडे जाण्याआधीच दोन वर्षांची  चिमुकली फातिमा ही खेळता खेळता ताप्ती गंगा गाडी मध्ये चढून गेली, होती.  फातिमा च्या पालकांनी  भुसावळ येथील त्यांचे नातेवाईक ताहीर भारमल यांना घटनेची माहिती सांगितली व चिमुकली फातिमा ताप्ती गंगा भुसावळ ला येत आहे तिला सांभाळा चे सांगितले. दरम्यान उप तिकीट निरीक्षक अनिल सोनी व खोसला यांनी चिमुकली फातीमाला रेल्वे सुरक्षा बलाचे हे. कॉ. जे एस पाटील आणि एन डी चौधरी यांच्या स्वाधीन करून त्यांना गाडीमधली हकीकत सांगितली  व भुसावळ येथील नातेवाईक ताहीर भारमल यांना  मुलीचे पालक भुसावळला येईपर्यंत तुम्ही रेल्वे सुरक्षा बलाचे  कर्मचारी सोबत राहण्याच्या सांगितले, दरम्यान बराणपुर ते भुसावळ दरम्यान दोंडाईच्या येथील प्रवास करणारे मुर्तुजा भाई यांनी चिमुकली फातिमा सा भुसावळ स्थानकापर्यंत सांभाळ केला. याकामी प्रवासी अब्बासी सज्जाद हुसेन नाशिक यांनीही ही मुलीची पालकांपर्यंत भेट करण्यासाठी सहकार्य केले.  टीसी दादांनी दाखवलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे रेल्वे स्थानकावर सर्वत्र कौतुक होते. 

टॅग्स :BhusawalभुसावळIndian Railwayभारतीय रेल्वे