शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

क्षयरोग दिन : बहुविध उपचार पद्धती ठरतेय क्षयरुग्णांना वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 13:02 IST

जागरुकता महत्त्वाची

ठळक मुद्देडॉटस्’ उपचार पद्धतीत दररोज गोळ््यारुग्णांना आहाराची मदत

जळगाव : पूर्वी असाध्य समजल्या जाणाऱ्या क्षयरोगावरील बहुविध औषधोपचार पद्धतीने आता त्याचा प्रसार रोखता येणे शक्य असून कमी कालावधीत उपचार मिळणारी ‘डॉटस्’ उपचार पद्धती क्षयरुग्णांना वरदान ठरत आहे. या सोबतच आता जिल्हा रुग्णलायात ‘सीबी नॅट’ ही अत्याधुनिक मशिन आल्याने त्याद्वारे लवकर निदान होण्यास मदत होत आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी जागृकता महत्त्वाची असून लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करणे गरजेचे आहे. या जागृकतेमुळे रुग्णाचा जीव वाचून इतरांनाही त्याचा संसर्ग होऊ शकत नाही.‘डॉटस्’ उपचार पद्धती वरदान‘डॉटस्’ औषधोपचार पद्धती मोठी फायदेशीर ठरुन त्याचे फायदेही अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ही पद्धती क्षयरुग्णांना वरदान ठरत आहे. ही पद्धती सर्व शासकीय, निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे. यासाठी दवाखान्यात दाखल होण्याची गरज नसते. केवळ गंभीर रुग्णांनाच दाखल व्हावे लागते. पूर्वी क्षयरुग्णाला १८ ते २४ महिन्यांपर्यंत औषधी घ्याव्या लागत होत्या, आता या पद्धतीत केवळ ६ ते ९ महिन्यांपर्यंतच उपचार घ्यावे लागतात.जळगाव जिल्ह्यात ३५०० रुग्णजळगाव जिल्ह्यात यंदा ३५०० रुग्णांची नोंद आहे. गेल्या वर्षी ही संध्या ३००० हजार होती. सध्या जागृतीमुळे नागरिक सतर्क होऊन निदान करू लागल्याने व अत्याधुनिक साधनांमुळे लवकर निदान होऊन लागल्याने ही संख्या वाढताना दिसते.रुग्णांना आहाराची मदतक्षयरोग रुग्णांना मोफत औषधी तर मिळते, मात्र त्यासाठी आहाराचीही गरज असते. हे ओळखून एकता पतसंस्थेचे अध्यक्ष ललित बरडिया यांनी पुढाकार घेऊन अशा रुग्णांना मोफत आहार देण्यास सुरुवात केली आहे. एका रुग्णाला एका महिन्याला साधारण १०७५ रुपयांचा आहार लागतो, तो दात्यांच्या मदतीने बरडिया उपलब्ध करून देत आहेत. अशा रुग्णाना मदत व्हावी म्हणून कुटुंबातील वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस व इतर औचित्य साधून नागरिकांनी पुढे यावे, असेही बरडिया यांचे म्हणणे आहे.क्षयरोग आता असाध्य रोग राहिलेला नाही. त्याच्या आधुनिक उपचार पद्धती विकसित झाल्या आहेत. क्षयरोगाची लक्षणे दिसताच निदान करून घ्यावे व उपचार पूर्ण करावे.- डॉ. जयवंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी.

टॅग्स :JalgaonजळगावHealthआरोग्य