शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

कराच्या बोझ्याने सुवर्णनगरीचा कणा वाकू लागला, केंद्र सरकार लक्ष देणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 23:24 IST

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : जगात सोन्याची तस्करी वाढण्यासह केंद्र सरकारकडूनही सोन्यावरील कराचा बोझा वाढविला जात असल्याने देशभरात सोन्याची झळाळी पोहचलेल्या सुवर्णनगरी जळगावातील सुवर्ण व्यवसायाला त्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सुवर्ण व्यवसायातील सततचा चढ-उतार चिंतेचा विषय बनून पारंगत कारागिरांच्याही रोजगारीवर परिणाम होत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात वाढविलेले सीमा शुल्काचे दर कमी करण्याकडे केंद्र सरकार लक्ष देणार की नाही, असा प्रश्न सुवर्णनगरी जळगावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात आहे.जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. त्यामुळे येथील सोने देशभरात पोहचून जळगावची ओळख सुवर्णनगरी अशी झाली आहे. त्यामुळे येथे सुवर्ण अलंकार घडविणाºया कारागिरांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू लागला. परिणामी येथे जवळपास सात हजार बंगाली कारागिर स्थिरस्थावर झाले व सुबक कलाकुसरीचे अलंकार आकाराला येऊ लागले. इतकेच नव्हे दिवसेंदिवस येथील सुवर्ण व्यवसाय वृद्धींगत होऊन शहरात दीडशेच्यावर सुवर्णपेढ्या तयार होऊन अनेकांना यामाध्यमातूनही रोजगार मिळाला.रुपयातील घसरणीने चिंतासोन्याच्या भावावर सर्वात मोठा परिणाम होतो रुपयातील चढ-उताराचा. गेल्या काही दिवसांपासून तर रुपयात मोठी घसरण होऊ लागल्याने सोन्याचे भाव उच्चांकीवर पोहचले. २६ फेब्रुवारी रोजी अमेरिकन डॉलर उच्चांकीवर पोहचून ७२ रुपये प्रती डॉलर त्याचे भाव झाल्याने सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. त्यानंतर हे भाव कमी झाले होते. मात्र जुलै महिन्यात केंद्र सरकारने सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्कात थेट अडीच टक्क्याने वाढ केल्याने त्याच दिवशी दुपारी सोने ३५० रुपये प्रती तोळ््याने वाढले. तेव्हापासून सोन्याच्या भावात सतत वाढ सुरू झाली. त्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसण्यासह व्यावसायिकही हवालदिल झाले.तस्करी व्यवसायाला घातकयंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची तस्करी वाढून दलालांकडून सोन्यात कृत्रिम मागणी वाढली व ११ जुलै रोजी सोने ३५ हजार रुपयांवर पोहचले होते. ही भाववाढ कमी न होता कायम राहत एक महिन्याच्या आतच सोन्यामध्ये पुन्हा दीड हजार रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन आॅगस्ट महिन्यात ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले. सोन्याच्या तस्करीमुळे भाववाढ तर होतच आहे, शिवाय या व्यवसायासाठी ही तस्करी घातक असल्याने सुवर्ण व्यावसायिकांची चिंता वाढविणारी आहे. सोन्यावरील करात होणाºया वाढीमुळ ेतस्करीही वाढते असे जाणकारांचे म्हणणे आहे.कारागिरांच्या रोजगारावर परिणामतस्करी पाठोपाठ केंद्र सरकारने सोन्याचे सीमा शुल्क १० टक्क्यांवरून थेट साडे बारा टक्के केल्याने त्याचा मोठा परिणाम सोन्याच्या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे कारांगिरांच्या कामावरही त्याचा परिणाम होऊन सात हजार कारागिरांच्या हाताला काम देणाºया सुवर्णनगरीतून बंगाली कारागिरही गावी परतू लागले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झेळ पोहचविण्यासह थेट व्यवसायावर परिणाम करणाºया व रोजगारीवर कुºहाड आणणाºया वाढीव कराचा बोझा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे गरजेचे असल्याचा सूर सुवर्णनगरीतून उमटत आहे.सणासुदीमुळे उत्साहदसरा-दिवाळी सणाच्या काळात सुवर्ण व्यवसायाला झळाळी येत आहे. मात्र ही झळाळी कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सुवर्णनगरीचा परंपरागत व्यवसाय व या शहराची ओळख कायम राहण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सुवर्ण व्यावसायिकांकडून होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव