शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

‘लखन’च्या कटेल्यांना ‘शबरी’च्या बोरांची चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:53 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘नातं’ या सदरात आपल्या गुणवंत, मेहनती आणि काबाडकष्ट करून लिहिणाऱ्या एका विद्यार्थ्याविषयी लिहिताहेत प्रा.बी.एन.चौधरी...

आमच्या धरणगाव येथील पी.आर. विद्यालयातून नुकताच इयत्ता दहावी पास होऊन जळगावच्या आयटीआयमध्ये प्रवेशित झालेल्या लखनने आज हे कटेले पाठवले. वानोळा म्हणून. छे, छे... त्याच्या शेतातील नाही. तर त्याने रोजंदारीवर कामाला जाताना तेथे गोळा केलेले. वाचून दचकलात ना. पण हे खरं आहे. मित्रांनो, हल्ली बाजारात ते भरपूर आले आहेत. मात्र मात्र, आमच्या या आदर्श विद्यार्थ्याने प्रेमाने भेट म्हणून पाठवलेल्या या कटेल्यांचे सुदाम्याच्या पोह्यांशी आणि शबरीच्या बोरांशी थेट नाते आहे. या कटेल्यांचं बाजार मूल्य फार थोडं आहे. मात्र, त्या मागील त्याची भावना अमूल्य आहे. हे कटेले आज आम्ही सर्वांनी खाल्ले तर त्याला अक्षरश: शबरीच्या बोरांची गोडी वाटली. एखाद्या शिक्षकाला याहून मोठा पुरस्कार दुसरा असूच शकत नाही. तोही विद्यार्थ्याकडून. मी धन्य झालो.लखन देवीदास चव्हाण हा पाचोरा तालुक्यातील लोहाºयाजवळील आदिवासी तांड्यावरचा. लाजरा, बुजरा व संकोची. घरात सर्व अशिक्षित. हा शिक्षणासाठी आमच्या शाळेत आठवीला आला. येथील संत दगाजी शासकीय वसतिगृहात राहण्याची व जेवणाची मोफत सोय झाली म्हणून. नियमित, शिस्तप्रिय, अभ्यासू, गुणी आणि समंजस असल्याने तो सर्वांचा लाडका झाला. त्याच्या वह्या, पुस्तकं, गाईडस, अपेक्षितं, मोफत मार्गदर्शन, परीक्षा फी आणि इतर सर्व खर्च आम्ही सर्वांनी उचलला. त्याने फक्त अभ्यास केला. सुटीत गावी शेतमजुरीची कामं केली. घरच्यांना हातभार लावला. वर्षभर त्याला आम्ही ‘रायझिंग स्टार’ म्हणूनच संबोधलं आणि परीक्षेत त्याने चक्क ८७ टक्के गुण मिळवले. विशेष म्हणजे कोणताही खासगी क्लास न लावता. त्याच्या कष्टाला यश मिळालं आणि आम्हाला समाधान. घरची परिस्थिती पाहून त्याने आयटीआय करण्याचा निर्णय घेतला. कागदपत्रांची जमवाजमव, अर्ज, फाटे करून झाले. यासाठी तो रोज धरणगावी येत जात होता. प्रवेश अर्ज भरला आणि त्याचा शासकीय आयटीआय, जळगावला नंबर लागला.आजही तो शनिवार, रविवार शेतात काम करतो. हे करत असताना त्याने दिवसभरात काही कटेले जमा केले आणि लक्झरी बस ड्रायवरच्या हाती मला पाठवून दिले. हा निरोप दिला तेव्हा तो मला कागदपत्रे पाठवतो असं म्हणाला. शिपायाने थैली आणली आणि त्यातील हे कटोले पाहिले आणि मी मंत्रमुग्ध झालो. डोळ्यात पाणी तरळलं. हे आनंदाश्रू होते, कृतकृत्य झाल्याचे.लखनला लेखन, वाचनाची आवड आहे. शाळेत येणाºया प्रत्येक वक्त्यांच्या भाषणाच्या त्याने नोट्स काढल्या आहेत. त्याच्या २०० पेजेस तीन वह्या भरल्या आहेत. तो रोजनिशी लिहतो. त्यासाठी त्याला नववर्षाला मी नियमित डायºया दिल्या. छान व्यक्त होतो तो. त्याला खूप समज आणि जाणीव आहे. तो भविष्यात मोठा अधिकारी होईल यात मला शंका नाही. त्याच्या होस्टेलची फी भरायची तयारीही मी दाखवली होती. मात्र विनम्रतेने त्याने ती नाकारली. पुढील काळात गरज पडेल तेव्हा मला हाक दे, असा सज्जड दमच भरलाय मी त्याला. खूप गोड छोकरा आहे तो. लखनकडे असलेली समंजस वृत्ती आणि अडचणी, संकटाला भिडण्याचं धैर्य कौतुकास्पद आहे.महत्त्वाचं म्हणजे आपल्या परिस्थितीची व पालकांच्या कष्टाची त्याला जाण आहे. ८७ टक्के गुण मिळवूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. त्याने ठरवलं असतं तर तो अकरावी, बारावी किंवा डिप्लोमाही सहज करू शकला असता. मात्र, घरच्यांना लवकर मदत करू शकेल, असं शिक्षण त्यानं निवडलं. त्याच्या या निर्णयाचं मला अप्रूपच वाटलं.जळगावच्या शासकीय आयटीआयमध्येही तो प्रत्येकाचं मन जिंकून घेईल याची मला खात्री आहे. आयटीआयवरच तो थांबेल असं मला वाटत नाही. कारण त्याच्या अपेक्षा मर्यादित असल्या तरी त्याची क्षमता अमर्याद आहे. तिचा सुयोग्य उपयोग व्हावा हीच माझी इच्छा आहे.असाच एखादा लखन तुमच्या आसपासही असेल. मित्रांनो, त्यास जीवापाड जपा. एक माणूस समाजात सकारात्मक ऊर्जा घेऊन ताठ मानेने उभा राहू शकेल. एक घर सावरू शकेल.- प्रा.बी.एन. चौधरी, धरणगाव, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यDharangaonधरणगाव