शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील तांबापुरा व सुप्रीम कॉलनीत तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 11:49 IST

तांबापुरा येथे शनिवारी रात्री साडे दहा वाजता एका गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यात मुकेश संतोष सपकाळे (रा.खेडी) या तरुणाला पकडून मारहाण झाली तर विजय लक्ष्मण बोदडे यांच्या हाताला एका जणाने चावा घेतला तर दगडफेकीत विकार खान जखमी झाला. याप्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देदगडफेकीत तीन जण जखमीपूर्ववैमनस्यातून वाद पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९ : तांबापुरा येथे शनिवारी रात्री साडे दहा वाजता एका गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यात मुकेश संतोष सपकाळे (रा.खेडी) या तरुणाला पकडून मारहाण झाली तर विजय लक्ष्मण बोदडे यांच्या हाताला एका जणाने चावा घेतला तर दगडफेकीत विकार खान जखमी झाला. याप्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, सुप्रीम कॉलनीतील पोलीस लाईनमध्ये लग्नाच्या वरातीतून जाणाºया दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन हार्दीक पाटील या तरुणावर एकाने चॉपर हल्ला केला. त्यामुळे येथेही तणाव निर्माण झाला होता. शनिवारी रात्रभर व रविवारीही या भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.पूर्ववैमनस्याची किनारपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकार खान व मुकेश सपकाळे यांच्यात सहा ते आठ महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्यांच्यातील वादातून ही तणावाची घटना घडली आहे. विकार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर मुकेश याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे दरम्यान, दगडफेक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव, सहायक निरीक्षक समाधान पाटील, योगेश शिंदे, रोहन खंडागळे, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव, मनोज सुरवाडे यांच्यासह अन्य कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत दगडफेक करणाºयांची धरपकड केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागातील सर्व गुन्हे शोधच्या कर्मचाºयांना तातडीने आहे त्या स्थितीत तांबापुरा व सुप्रीम कॉलनीत पोहचण्याचे आदेश झाले होते.  सुप्रीम कॉलनीत तणावसुप्रीम कॉलनीतील पोलीस लाईनमध्ये लग्नाची वरात सुरु असताना त्यावेळी दुचाकीवरुन घराकडे जात असलेल्या हार्दीक पाटील व गणेश शिंदे या दोघांच्या दुचाकीचा कट एका जणाला लागला. त्यावरुन तुंबळ हाणामारी झाली.

इच्छादेवी चौकीपासून दगडफेकतांबापुरातून १५ ते २० जणांचा एक गट इच्छादेवी चौकाकडे चालत आला. त्यातील आठ जण पोलीस चौकीवर बसले. तर उर्वरित चौकीच्या मागे गेले व त्यांनी अचानक दगड, विटांचा मारा सुरु केला. यावेळी मुकेश सपकाळे या तरुणाला अडवून मारहाण झाली. डोक्यात दगड टाकल्याने रक्तबंबाळ झालेल्या मुकेश याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. विजय लक्ष्मण बोदडे यांनाही दोन जणांनी पकडून ठेवत त्यातील एकाने त्यांच्या हाताच्या पंजाला चावा घेतला. दगडफेकीत विकार खान हा तरुण देखील जखमी झाला आहे. या दगडफेकीत जीव मुठीत घेऊन महिला या लहान मुलांना घेऊन धावत सुटल्या. फरशीचे तुकडे व विटांचा मारा सुरु झाल्यामुळे सर्वत्र पळापळ झाली. यावेळी हल्लेखोरांनी पोलीस चौकीवर देखील दगडफेक केली. बेबाबाई सोनु सुरवाडे या महिलेचा मुलगा दीपक याला मारहाण होत असल्याने पाहून बेबाबाई यांनी दुसºया अपंग मुलाला सुरक्षितस्थळी हलविले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून महिलांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने बॅनर लावल्यावरुन वादाची शक्यता वर्तविली होती.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा