शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

यावल तालुक्यातील दहिगाव येथे तालुका विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:12 IST

डोंगरकठोरा, ता. यावल , जि.जळगाव : विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेतल्यास अशा विज्ञान प्रदर्शनातूनच शास्त्रज्ञ घडू शकतो. यासाठीच विज्ञान प्रदर्शनाची ...

ठळक मुद्देप्रदर्शनात १८६ उपकरणांची मांडणीविज्ञान प्रदर्शनातूनच घडू शकतो- आमदार हरिभाऊ जावळेविजेत्यांना पारितोषिके वितरीत

डोंगरकठोरा, ता.यावल, जि.जळगाव : विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेतल्यास अशा विज्ञान प्रदर्शनातूनच शास्त्रज्ञ घडू शकतो. यासाठीच विज्ञान प्रदर्शनाची गरज असते, असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले. यावल पं. स.च्या शिक्षण विभागातर्फे दहिगावच्या आदर्श विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं. स. सभापती पल्लवी चौधरी होत्या. प्रदर्शनात १८६ उपकरणे मांडण्यात आली होती.प्रमुख पाहुणे उपसभापती उमाकांत पाटील, जि. प.सदस्या सविता भालेराव, रवींद्र पाटील, नंदा सपकाळे, पं. स. सदस्य शेखर पाटील, कलिमा तडवी, दीपक पाटील, एकात्मिक आदिवासी अध्यक्ष मीना तडवी, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, संस्था चेअरमन सुरेश पाटील, हिरालाल चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, राजाराम महाजन, मेघश्याम चौधरी, साजिया तडवी, देवीदास पाटील, साकीर तडवी, जयंत चौधरी, नीता साठे, गटशिक्षणाधिकारी एजाज शेख, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश शिवदे, नईम शेख, केंद्रप्रमुख विजय ठाकूर, विजय मेढे, एन.डी. तडवी,सुरेश तायडे, सलिम तडवी, प्रमोद सोनार, प्रदीप सोनवणे, सुलोचना धांडे, तालुका समनव्यक नरेंद्र महाले, मुख्याध्यापक एस.डी. चौधरी, जी.एस. पाटील, एम.आर.महाजन उपस्थित होते.प्रास्ताविकात एजाज शेख यांनी विविध वैज्ञानिकांनी लावलेले शोध व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी झालेला फायदा यांची माहिती दिली.प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी विविध लक्षवेधी उपकरणे, प्रतिकृतींची मांडणी केली होती. त्यात प्राथमिक ५४,माध्यमिक ३८ ,तर शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य ९४ अशी एकूण १८६ उपकरणे मांडण्यात होती. प्रदर्शनात कृषी व जैविक शेती, आरोग्य व स्वच्छता, संसाधन व व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, गणितीय प्रतिकृती आदी विषयाशी निगडीत उपकरणे होती. सूत्रसंचालन व आभार विलास पाटील यांनी मानले. परीक्षक म्हणून गणेश जावळे, पी.एम. इंगळे, सुनील पाटील, पी.एम. जोशी, खान होते.विज्ञान उपकरणे विजयी स्पर्धकप्राथमिक स्तर-प्रथम वेदांत नेवे (शारदा विद्यामंदिर,साकळी), द्वितीय सुशांत बारी (कुसुमताई विद्यालय,फैजपूर), तृतीय अतल पटेल (ऊर्दू, कोरपावली).माध्यमिक स्तर- प्रथम अक्षय पाटील, हर्षवर्धन पाटील (आदर्श विद्यालय, दहिगाव), द्वितीय संजना नेमाडे (ज्योती विद्यामंदिर, सांगवी), तृतीय संकेत फेगडे े(न्यू इंग्लिश स्कूल भालोद). शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य- प्राथमिक प्रथम बागवान अहमद (उर्दू, मारुळ ) व कल्पना माळी (जि. प.परसाळे), माध्यमिक प्रथम मनोज महाजन (शारदा विद्यालय, साकळी). लोकसंख्या शिक्षण- प्रथम जयश्री काळवीट (जि. प.निमगाव). आदिवासी शाळा-प्रथम मोहिनोद्दीन तडवी (आश्रमशाळा, मोहरळे).

टॅग्स :scienceविज्ञानYawalयावल