यावेळी टाकळी प्र.चा येथील सतीश महाजन, ग्रा.पं. सदस्य संदीप स्वार, अण्णा गवळी, भावेश कोठावदे, प्रल्हाद महाजन, विजय पाटील, चंद्रकांत महाजन, आबा महाजन, विजय गुजर, युवराज गुजर, भूषण महाजन, बाबूराव जाधव उपस्थित होते.
चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारे टाकळी प्र.चा. हे गाव चाळीसगाव शहराच्या लगत पसरलेले असून गावात जवळपास २५ हजार लोकवस्ती आहे. या गावातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने गावात नोकरदार, उद्योजक, छोटे-मोठे व्यावसायिक यांची प्रामुख्याने वसाहत आहे. सद्य:स्थितीत गावात कार्यरत असणारी गिरणा नदीवरील जुनी पाणीपुरवठा योजना ही अपूर्ण पडत असल्याने ८ दिवसांआड टाकळी प्र.चा. गावात पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत असल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. काही महिन्यांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी टाकळी प्र.चा. गावासाठी १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्याला मंजुरी देऊन त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तत्कालीन सचिवांना दिले होते. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे किशोर राजे निंबाळकर यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती झाली अन् या योजनेच्या कामाला गती मिळाली.
अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये...
योजनेंतर्गत टाकळी प्र.चा. गावात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार असून गाववासीयांना प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी उपलब्ध होईल. यासोबतच नवीन अत्याधुनिक प्रणालीची पाइपलाइन, वाढीव जलकुंभ व प्रत्येक घराला नळकनेक्शन दिले जाणार आहेत. यामुळे गावातील प्रत्येक प्रभागाला सारख्या दाबाने पाणीपुरवठा होऊन पाणीटंचाई कायमस्वरूपी मिटणार आहे.
वीजवितरण कंपनीच्या वतीने होणारे लोडशेडिंग, तांत्रिक कारणांमुळे अनेकदा पाणीपुरवठा करण्यास व्यत्यय येतो, यासाठी या योजनेत सोलर प्लांटचादेखील समावेश करण्यात आला असून वीज व सोलर एनर्जी यावर कार्यरत असणारी ही चाळीसगाव तालुक्यातील पहिली पाणीपुरवठा योजना असणार आहे.