शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

भुसावळात तरूणावर तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 22:09 IST

मिरचीपूडसह टाकले पेट्रोल : जखमीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

जळगाव- भुसावळ महामार्गावरील सुहास हॉटेल समोर पूर्वमैमनस्यातून तरूणावर तलवार हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडली़ प्रशांत संजय चौधरी (वय-३०, रा़ भुसावळ) असे जखमी तरूणाचे नाव आहे़ दरम्यान, डाव्या हातावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर जळगाव जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.दुकान गाळ्याच्या कारणावरून प्रशांत चौधरी याच्या वडीलांचे काही तरूणांशी दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता़ नंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले़ मात्र, या प्रकरणात प्रशांत याच्याविरूध्दही बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ अखेर शुक्रवारी दुपारी लहान भाऊ डिगंबर याने त्यास पोलीस ठाण्यात जमा होवून जा असे सांगितले म्हणून तो लहान भावाची दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भुसावळ महामार्गावरील सुहास हॉटेलसमोर वाट बघत होता़ त्याचवेळी अचानक आठ ते दहा तरूणांनी त्यास लाकडी दांड्याने मारहाण केली़ तर मिरची पूड व पेट्रोल अंगावर टाकले़तलवारने हातावर केला वारलाकडी दांड्यांनी मारहाण केल्यानंतर एकाने प्रशांत चौधरी यांच्या डाव्या हातावर तलवारने वार केला़ त्यात प्रशांतच्या बोटाला गंभीर दुखापत झाली़ काही वेळानंतर मोठ्या भावाला मारहाण झाल्याचे कळताच लहान भाऊ डिगंबर याने घटनास्थळी धाव घेवून भावाला रूग्णालयात नेले़ त्यानंतर जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले़डॉक्टर नसल्याने घातला गोंधळजिल्हा रूग्णालयात प्रशांत याच्या प्राथमिक उपचार केल्यानंतर एक्सरे काढण्यासाठी पाठविण्यात आले़ त्या काळात प्रशांतला रक्ताच्या उलट्या झाल्या़ अन् त्याठिकाणी डॉक्टरचं उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांसह मित्र मंडळींचा संताप अनावर झाला़ त्यांनी गोंधळ घालत डॉक्टर कुठे आहे अशी विचारणा केली़ त्यामुळे काहीवेळ जिल्हा रूग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता़अतिदक्षता विभागात उपचार सुरूडाव्या हाताच्या बोटाला तसेच हाता-पाठीला गंभीर दुखापत झाल्यामुळे जखमी प्रशांत चौधरीला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले़ नंतर पोलिसांनी त्याचे जबाब नोंदवून घेतले़

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव