शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अधिकृत ट्रेडमार्क नसणाऱ्या खाद्यतेल कंपनीचे गोडावून केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 22:26 IST

लेबलचा आर्टवर्क नसताना हुबेहुब नक्कल करुन खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या हिरापूर रोडस्थित खान्देश एक्स्ट्रक्शनमधील नारायणी ट्रेडिंग कंपनीच्या गोडावूनवर मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हर पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजता कारवाई केली.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे आदेशाने चाळीसगाव येथे कारवाईपाच ते सहा लाखाचा माल जप्त

 लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : अधिकृत नोंदणी केलेला ट्रेडमार्क व रजिस्टर लेबलचा आर्टवर्क नसताना हुबेहुब नक्कल करुन खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या हिरापूर रोडस्थित खान्देश एक्स्ट्रक्शनमधील नारायणी ट्रेडिंग कंपनीच्या गोडावूनवर मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हर पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजता कारवाई केली. यात गोडावूनमधील पाच ते सहा लाख रुपये किंमतीचा माल सील करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी की, धुळे एमआयडीसीतील सोया ड्राॕप या खाद्यतेल बनविणाऱ्या कंपनीच्या नोंदणीकृत रजिस्टर्ड ट्रेडमार्क आणि रजिस्टर लेबल आर्टवर्क सारखेच डिझाईन तयार करुन सोया अमृत नावाने खाद्यतेल विक्री केली जात आहे. एकसारखेच आर्टवर्क आणि रंगसंगीताचा सारखाच वापर करण्यात येत आहे. यावर संजय सोया ड्राॕप कंपनीचे डायरेक्टर संजय अग्रवाल यांनी त्यांच्या अधिकृत मान्यता असलेल्या नोंदणीकृत रजिस्टर्ड ट्रेकमार्क व लेबलचा आर्टवर्क सादर करुन मुंबई उच्च न्यालयात धाव घेतली. याविरोधात कारवाईची मागणीही केली.त्यानुसार न्यालयाने रिसिव्हर पथकाची नेमणूक करुन कारवाईचे आदेश दिले. मंगळवारी दुपारी पथकाने गोडावून मध्ये जाऊन एक किलो वजनासह पाच व पंधरा किलो वजनाचे पाऊच, बॕरल व डबे असा एकुण पाच ते सहा लाखाचा माल सील केला आहे.ऐन दिवाळीत खाद्यतेलाबाबत ही दुसरी कारवाई आहे. पाच रोजी अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने चाळीसगाव येथेच चार लाख रुपये किंमतीचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा मुद्देमाल जप्त केला. दिवाळीत खाद्यतेलाची मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे.

 

आमच्या खाद्यतेल बनविणाऱ्या कंपनीचा नोंदणीकृत रजिस्टर्ड ट्रेडमार्कआहे. लेबलचे आर्टवर्क व डिझाईनही नोंदणीकृत आहे. याची नक्कल करुन चाळीसगावात खाद्यतेलाची विक्री होत आहे. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये ही कारवाई झाली आहे. यामुळे अनधिकृत ट्रेडमार्क व लेबलचा वापर करुन खाद्यतेल विक्री करणा-यांना चाप बसणार आहे.-संजय अग्रवाल,डायरेक्टर, सोया ड्रॉप कंपनी, धुळे

 

आम्ही सोया अमृत नावाने नोंदणी व रजिष्टर लेबल आर्टवर्क, डिझाईनसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. आमचे लेबल व डिझाईन वेगळे आहे. एकसारखे नाही.-क्रिष्णकुमार माहेश्वरी,चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव