शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईचा स्वप्निल शहा विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:42 IST

चाळीसगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १२३ खेळाडुंचा सहभाग

ठळक मुद्देराज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १२३ खेळाडुंचा सहभागस्वप्निल शहाच्या चेकमेट मुळे उपस्थित भारावलेमुंबई व पुण्याच्या स्पर्धकांनी गाजविले वर्चस्व

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव: दि.१७ : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ आणि आॅल मराठी चेस असोसिएशन फॉर दि ब्लाइंड व्हिज्युअली चॅलेंज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईचा स्वप्निल शहा विजेता ठरला. राज्यभरातुन १२३ खेळाडुंनी सहभाग नोंदविला.तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. त्यात स्वप्निल शहा (मुंबई) प्रथम तर मिलिंद सामंत (पुणे) द्वितीय, मदन बागायतदार (मुंबई) तृतीय, विकास शितोळे (पुणे) चतुर्थ, नवनाथ बोगडे (पुणे) पाचवा यांना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.समारोप कार्यक्रमात आमदार उन्मेष पाटील यांनी अपयशातूनच पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. अंध खेळाडू मोठ्या आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरले. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार कैलास देवरे, चाळीसगाव शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर, चंद्रशेखर उपासनी, अजय दीक्षित, राष्ट्रीय बुद्धीबळ स्पधेर्चे पंच नरेंद्र ठाकरे, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे सचिव महादेव गोरे, अध्यक्ष महादेव गुरव, जनरल सेक्रेटरी वसंत हेगडे, आॅल इंडिया असोसिएशन फॉर दि व्हिज्युअली चॅलेंजचे पंकज बेंद्रे, सतीष पवार, सलिम पठाण, एम.बी. पाटील आदी उपस्थित होते. प्रास्तविक वसंत हेगडे यांनी केले. यशस्वीतेसाठी बाळासाहेब पवार, जयंत देवीभक्त, अभय कसबे, संजय घोडराव, अनिष गावित, ज्ञानेश्वर अल्हाटे, राजेंद्र सोनवणे, चिंतामण अहिरे यांनी सहकार्य केले.चेकमेट मुळे उपस्थित भारावलेअंध खेळाडु बुद्धीबळ कसे खेळतात. या उत्सुकेतेपोटी स्पर्धेच्या वेळी शहरातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. डोळस खेळाडु देखील चांगल्या चाली करु शकणार नाहीत. अशा चाली अंध खेळाडुंनी केल्या. अंतिम लढतीत आठ फे-या झाल्या. स्वप्निल शहाच्या चेकमेटने स्पर्धेत रंगत वाढविली. त्याने साडेसात गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली. स्पर्धेत प्रत्येकी पाचशे रुपयांची २० तर शाळा स्तरावरील १० खेळाडुंना बुद्धीबळ साहित्य देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव