आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.२७ : सुप्रीम कॉलनीत राहणाºया अनिता राज राजपूत (वय ३१) या महिलेचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या आठवड्यापासून अनिता राजपूत ही महिला आजारी होती व दोन दिवसापूर्वीच तिची दवाखान्यातून सुटका झाली होती. मंगळवारी पुन्हा प्रकृती खालावल्याने शेजारच्या लोकांनी तिला खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले, तेथे डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्यात सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात येत असताना रस्त्यातच या महिलेची प्राणज्योत मालवली. वैद्यकिय अधिकारी डॉ.विसपुते यांनी अनिता यांना मृत घोषीत केले.अनिता राजपूत ही महिला मुळची खामगाव येथील असल्याचे शेजारच्यांनी सांगितले. सुकलाल पूनमचंद राजपूत यांच्या घरात पाच वर्षांपासून ती एकटीच भाड्याने राहत होती. घर घेताना आपण खामगाव येथील असल्याचे तिने सांगितले होते. मात्र आई, वडील, पती व मुलांबाबत ती काहीच माहिती सांगत नव्हती.
जळगावातील सुप्रीम कॉलनीत महिलेचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:17 IST
सुप्रीम कॉलनीत राहणाºया अनिता राज राजपूत (वय ३१) या महिलेचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
जळगावातील सुप्रीम कॉलनीत महिलेचा संशयास्पद मृत्यू
ठळक मुद्देमयत महिलेला शेजारच्यांनी दवाखान्यात हलविलेमयत महिला मूळची खामगाव येथील रहिवासीजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी केले मयत घोषित