शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

पिलखोड येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:11 IST

शेतीसाठी तीन सासरच्यांनी मागितले तीन लाख : खून केल्याचा आरोप

जळगाव : तालुक्यातील पिलखेडा येथील रोहीणी महेंद्र कोळी (२३) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सासरच्यांचे म्हणणे आहे तर माहेरच्या लोकांनी हा खून असल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता घटना उघडकीस आली.नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती घेण्यासाठी माहेरहुन तीन लाख रुपये आणावेत यासाठी गेल्या महिनाभरापासून पती महेंद्रसह सासूकडून रोहिणीचा छळ सुरू होता. दिवाळीला घरी आल्यानंतर रोहिणीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे कुटुंबियांनी पैसे देण्यास नकार दिला होता. तेंव्हापासून सासरचे मारहाण करुन रोहिणीचा शारिरीक तसेच मानसिक छळ करत असल्याचा आरोप रोहिणीचे वडील अशोक बळीराम तायडे (रा.पुरी गोलवाडे,ता. रावेर ) यांनी केला आहे.गळफास देवून सासरच्यांचे पलायनदोन दिवसांपूर्वी मोठी बहिण शिला सचिन सोनवणे हिस रोहिणीने फोनवरुन सासु, पतीकडून होणाऱ्या छळाबद्दल सांगितले होते. समजूत काढण्यासाठी सोमवारी रोहिणीची आई देखील तीच्या सासरी गेली होती. सासुने त्यांना घरात घेतले नव्हते. मंगळवारी नेमकी गावकऱ्यांकडून रोहिणीच्या गळफासाबाबत बातमी कळाली, असेही तायडे यांनी सांगितले. आत्महत्या नव्हे तर छळातून सासरच्या मंडळींनी तिचा खून केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. तिला गळफास देऊन त्यांनी घरातून पलायन केले,असेही ते म्हणाले.दरम्यान, रोहिणीच्या पश्चात पती, सासु व दीड वर्षांची मुलगी आराध्या असा परिवार आहे. या घटनेनंतर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कदीर तडवी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव