शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा अंधारेंची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल कमी झाल्याने ऑनलाइन सभाही रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 21:18 IST

मुक्ताईनगरच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सुषमा अंधारेंनी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला होता.

जळगाव:शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने त्यांचा रक्तदाब देखील कमी झाला. यानंतर डॉक्टर त्यांच्या हॉटेलमध्ये दाखल झाले आणि सुषमा अंधारे यांची तपासणी केली. स्वत: अंधारे यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. 

सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात आज मुक्ताईनगरमध्ये सभा आयोजित केली होती. पण, पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर, त्यांनी ऑनलाइन सभा घेण्याचे ठरवले. पण, सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अंधारेंनी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शरीराची शुगर लेव्हल अचानक कमी झाल्याने त्यांनी ऑनलाइन सभा रद्द केली. 

सुषमा अंधारेंच्या गाडीला पोलिसांचा गराडासुषमा अंधारेंच्या सभेमुळे जळगावातील मुक्ताईनगरमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. पोलिसांनी सभेला परवानगी नाकरल्यानंतरही अंधारे सभास्थाळाकडे निघाल्या होत्या. पण, के प्राईड हॉटेलमधून सभास्थळी जाण्यास निघाल्या असता, शेकडो पोलिसांनी त्यांच्या गाडीला वेढा देऊन रोखले. यावेळी सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या. 'मी दहशतवादी आहे की गुंड? माझा नेमका गुन्हा काय आहे?' अशी विचारणा त्यांनी केली.

सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून पाठवलेले पार्सल

गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ही महाप्रबोधन यात्रा नव्हे तर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा आहे. हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. उरली सुरली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुषमा अंधारे यांना पाठवले आहे, असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेJalgaonजळगावShiv Senaशिवसेना