जळगाव : तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामामुळे गुरुवारी सुरत, नाशिक व मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आल्या व इतर सुपरफास्ट गाड्याही दुसºया मार्गे वळविण्यात आल्या. चार दिवस या गाड्या बंद राहणार असल्याने प्रवाशांचे पहिल्याच दिवशी प्रचंड हाल झाले. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता महामंडळातर्फे शुक्रवारपासून नाशिक ते जळगावदरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.भादली ते भुसावळ या तिसºया रेल्वे लाईनच्या कामासाठी चार दिवस पाच पॅसेंजर रद्द, तर चार एक्स्प्रेस गाड्या वळविण्यात आल्या आहेत. यामुळे नाशिक ते जळगाव व सुरत ते भुसावळ मार्गावरील प्रवाशांचे गुरुवारी मोठ्या प्रमाणात हाल झाले. पॅसेंजर रद्दमुळे सुपरफास्ट मनमाड, नाशिक व सुरतकडे जाण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच स्टेशनवर गर्दी केली होती.पॅसेंजर रद्दमुळे सुपरफास्ट गाडीने इच्छित स्थळी जाण्याचे प्रवाशांचे नियोजन होते. त्यासाठी सकाळपासून जळगाव स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. मात्र, मेगा ब्लॉकमुळे गाड्यांना विलंब झाल्याने प्रवाशांनी एसटी व आराम बसने प्रवास केला.भादली स्टेशनवर तिसºया लाईनच्या कामासाठी सकाळी सव्वाअकरा ते दुपारी पावणेचारपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे भुसावळकडून मुंबईकडे जाणारी अपमार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद होती. यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश व इतर राज्यातून येणाºया लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्या भुसावळ रेल्वेस्थानकावर थांबून होत्या. ब्लॉकमुळे ५ ते ६ तास या गाड्यांना विलंब झाल्याने जळगाव स्थानकावर गाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना सायंकाळपर्यंत ताटकळत बसावे लागले.
सुरत व नाशिक पॅसेंजर रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 15:55 IST
तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामामुळे गुरुवारी सुरत, नाशिक व मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आल्या व इतर सुपरफास्ट गाड्याही दुसºया मार्गे वळविण्यात आल्या. चार दिवस या गाड्या बंद राहणार असल्याने प्रवाशांचे पहिल्याच दिवशी प्रचंड हाल झाले. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता महामंडळातर्फे शुक्रवारपासून नाशिक ते जळगावदरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
सुरत व नाशिक पॅसेंजर रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल
ठळक मुद्देभादलीनजीक मेगा ब्लॉकआजपासून महामंडळाच्या जादा बसेसएसटी बसेसला प्रचंड गर्दीप्रवासी जळगाव व भुसावळ स्टेशनवर ताटकळले