शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

वरपित्याने 14 फेब्रुवारीच्या लग्नाच्या वरातीसाठी बुक केलेला डिजे केला रद्द, लेवा पाटीदार समाजाचा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 09:03 IST

खानापूर येथे भोरगाव लेवा पंचायत महाधिवेशनात पारीत केलेल्या सामाजिक ठरावान्वये आदर्श निर्णयांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित बैठकीत सामाजिक कार्यकर्ते वामन हरी धांडे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. 

रावेर - तालुक्यातील खानापूर येथे भोरगाव लेवा पंचायत महाधिवेशनात पारीत केलेल्या सामाजिक ठरावान्वये आदर्श निर्णयांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित बैठकीत सामाजिक कार्यकर्ते वामन हरी धांडे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या मुलाच्या 14 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या लग्नवरातीकरिता बुक केलेला डिजे रद्द करीत असल्याचे घोषित करून निव्वळ समाजातील प्रतिष्ठेच्या बडेजावपणासाठी डिजिटल म्युझिकल बँडकरिता निरर्थक खर्च केले जाणार्‍या अर्धा ते सव्वा लाख रुपयांच्या खर्चाची बचत करण्यासह ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं आदर्श प्रस्थापित केला आहे.खानापूर गावातील समस्त लेवा पाटीदार समाजाची साधारण सभा बुधवारी संपन्न झाली. पाडळसे येथे भोरगाव लेवा पंचायत महाअधिवेशनात कुटुंबनायक रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या ठरावांची माहिती सादर करून, समाजबांधवानी सर्व संमतीने ती सामाजिक आचारसंहिता अंमलात आणण्याचा एकमुखी घेतला.त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते वामन हरी धांडे यांनी पुणे येथे खासगी कंपनीत सेवारत असलेल्या बीएससी पदवीधर असलेल्या रुपेश या मुलाच्या सावदा येथे 14 फेब्रुवारी रोजी आयोजित शुभमंगल विवाहातील लग्न-वरातीकरिता बुक केलेला डिजे रद्द करीत असल्याचा निर्णय घोषित केला आणि समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे उपस्थित समाजबांधवानी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या शाखेद्वारे समाजप्रबोधनासाठी अधिवेशनाचा हा संदेश व सभेतील ठरावांची माहिती आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. "सकल लेवा पाटीदार "समाजाच्या उभारणीसाठी समाजातील पोटजातींचे एकत्रीकरण करून विवाह संबंध प्रस्थापित करीत त्याची मुहूर्तमेढ करून प्रोत्साहन देण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीत समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Jalgaonजळगाव