शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार योजनेत पूरक म्हणून आता दूध भुकटीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 20:19 IST

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ

चोपडा, जि.जळगाव : इयत्ता पहिली ते आठवीसाठी दिला जाणारा शालेय पोषण आहार योजनेत पूरक योजना म्हणून आता शाळाशाळांमध्ये दूध भूकटीची वाटप योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.राज्यात सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या अतिरिक्त दूध व दूध भुकटीच्या संदर्भात शासन स्तरावरून करण्यात येणाऱ्या उपाययोजना म्हणून १० जुलै रोजी शासनातर्फे विधानसभेत निवेदन करण्यात आले होते. सदर निवेदनामध्ये राज्यात विविध विभागामार्फत सुरू असलेल्या पोषण आहार योजनेमध्ये दूध अथवा दूध भुकटीचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता. शालेय पोषण आहार योजनेत पूरक योजना म्हणून दूध भुकटी वाटप योजना राबवण्याचा निर्णयही शासनाने घेतलेला आहे.इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा शाळांमध्ये दूध भुकटीपासून तयार केलेले दूध देण्यासाठी एका विद्यार्थ्यास एका महिन्यात २०० ग्रॅम दूध भुकटीचे एक पाकीट असे तीन महिन्यांसाठी ६०० ग्रॅमची तीन पाकिटे विद्यार्थ्यास घरी देण्यात येतील. सदर भुकटीमधून पालकांनी त्यांच्या पाल्यांना दूध भुकटीपासून घरी दूध तयार करून देणे अपेक्षित आहे. सदर दूध भुकटीचे विद्यार्थ्यांना एकाच दिवशी वाटप करण्यासाठी संबंधित शाळांना दूध भुकटी वाटप दिवस जाहीर करून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत संबंधित विद्यार्थ्यांना दूध भुकटीचे पाकीटे वाटप करावीत. त्याच दिवशी सदर भुकटीपासून दूध कसे तयार करावे. याबाबत सविस्तर सूचना विद्यार्थ्यांना द्याव्या. सदर योजना तीन महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे व पुरविण्यात येणारी दूध भुकटी ही महाराष्ट्र राज्यात उत्पादित झालेली असावी. दूध भुकटी वाटपाच्या अंमलबजावणीसाठी समितीही गठित करण्यात आल्याचे संबंधित शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

टॅग्स :SchoolशाळाChopdaचोपडा