शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहचवणे तसेच अडीअडचणी सोडवण्यावर समिती भर देणार आहे.
सदस्यपदी तालुक्यातील शंकर बैसाणे (देवळी), सुलोचना वाघ (अमळनेर), शीतल पाटील (कुर्हे बु.), भय्यासाहेब पाटील (रढावन), सुभाष आगळे (निम), कल्पना पाटील (निंभोरा), रेखाबाई पाटील (ढेकू खु.), उमाकांत साळुंखे (मारवड), निवृत्ती बागुल (गडखांब), शैला पाटील (मुडी प्र. डांगरी), मंगलबाई पाटील (टाकरखेडा), कल्पना पवार (पातोंडा), आश्लेषा साळुंखे (गांधली),भटू पाटील (मंगरूळ), हेमंत महाजन (अमळनेर), विजयकुमार जैन (मुडी), प्रशांत भदाणे (दहिवद), शिवाजीराव पाटील (अंतुर्ली), श्यामकांत पाटील (जवखेडा), प्रवीण पाटील (गंगापुरी), विनोद जाधव (नगाव बु.), रवींद्र पाटील (जानवे), सुरेश पाटील (निंभोरा).
यासोबतच तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील (कळमसरे-जळोद गट), मीनाबाई पाटील (दहिवद-पातोंडा गट), सोनू पवार (जानवे-मंगरूळ गट), संगीता भिल्ल (मुडी-मांडळ गट) तसेच पंचायत समितीच्या सभापती त्रिवेणीबाई शिवाजी पाटील (शिरूड गण) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा क्षेत्रप्रमुख, ग्रामीण व शहर कार्याध्यक्षांसह सर्व सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी निवड झालेल्या पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.