शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यातील भादलीच्या तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:51 IST

तालुक्यातील भादली बु. येथील प्रशांत रामचंद्र अत्तरदे (वय ३३) या तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे कारण अस्पष्ट  जळगाव खुर्द शिवारात आढळला मृतदेहशनिवारपासून होता गायब

जळगाव : तालुक्यातील भादली बु. येथील प्रशांत रामचंद्र अत्तरदे (वय ३३) या तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव खुर्द शिवारातील रेल्वे रुळावर खांब क्र.४३३/१९ ते २१ च्या दरम्यान तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती स्टेशन प्रबंधकांकडून मिळाल्यानंतर लोहमार्ग व नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. उपनिरीक्षक जी.आर.हिवरकर व सहका-यांनी प्रशांत याच्या संशयास्पद मृत्यूबाबत चौकशी केली, मात्र ठोस माहिती मिळाली नाही.शनिवारी कामाला गेला परत आलाच नाहीप्रशांत हा गोदावरी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील लॉन्ड्री विभागात कामाला होता. शनिवारी सकाळीच तो कामाला गेला होता. रात्री घरी परत आलाच नाही. बºयाचदा रात्रपाळीची ड्युटी करीत असल्याने आजही तो रात्रपाळीलाच असावा म्हणून कुटुंबानेही त्याची चौकशी केली नाही. रविवारी त्याचा मृतदेह आढळल्याची माहितीच कुटुंबाला मिळाली. प्रशांत हा विवाहित असून पश्चात पत्नी कुंदा, दोन मुली, वडील रामचंद्र काशिनाथ अत्तरदे, आई हिराबाई व मोठा भाऊ विनोद असा परिवार आहे. प्रशांतच्या या घटनेबाबत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी