शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 18:15 IST

बोदवड येथील प्रभाग क्रमांक सहामधील शिवद्वारजवळील रहिवासी प्रवीण सुरेश हजारे (वय २४) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. २१ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सायंकाळी त्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार होता. त्याआधीच अंत्ययात्रा निघाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपत्नीच्या डोहाळे कार्यक्रमापूर्वीच अंत्ययात्राहजारे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरआत्महत्येचे कारण समजू शकले नाही

बोदवड, जि.जळगाव : बोदवड येथील प्रभाग क्रमांक सहामधील शिवद्वारजवळील रहिवासी प्रवीण सुरेश हजारे (वय २४) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. २१ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सायंकाळी त्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार होता. त्याआधीच अंत्ययात्रा निघाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.प्रवीण हा विद्युत उपकरणे दुरुस्त करण्याचे काम करीत होता. त्याचे गत नऊ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पत्नीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम २१ रोजी सायंकाळी होणार होता. या कार्यक्रमासाठी बहिणीला घेऊन तो अमळनेर येथून २० रोजी रात्री घरी परतला होता.अमळनेरहून बोदवडला घरी परतला. २० रोजी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर तो झोपला. दुसऱ्या दिवशी घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याने कुटुंबीय कामात, तर घरी पाहुण्यांची लगबग होती. बराच वेळ होऊनही प्रवीण उठला नाही. यामुळे त्याची पत्नी व आई पाहण्यासाठी खोलीत गेले. तेव्हा तो पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर घरातील मंडळींनी दरवाजा तोडून त्याला काढले. तोपर्यंत तो गत प्राण झालेला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.या घटनेने संपूर्ण कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे, तर पत्नीवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, बहिण व भाऊ आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBodwadबोदवड