शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव परिसरात वृध्देची स्वत: ला जाळून घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 23:00 IST

अंगावर रॉकेल ओतून स्वत:च जाळून घेत कलाबाई भास्कर पाटील (वय ६०) या वृध्देने आत्महत्या केल्याची घटना देवगाव, ता.जळगाव येथे मंगळवारी घडली.

ठळक मुद्देजळगाव तालुक्यातील देवगाव येथील घटनाआत्महत्येचे कारण अस्पष्टजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

जळगाव : अंगावर रॉकेल ओतून स्वत:च जाळून घेत कलाबाई भास्कर पाटील (वय ६०) या वृध्देने आत्महत्या केल्याची घटना देवगाव, ता.जळगाव येथे मंगळवारी घडली. कलाबाई या अ‍ॅड.जितेंद्र पाटील यांच्या आई होत्या. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कलाबाई या देवगाव येथे घरी असताना सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:लाच पेटवून घेतले. त्या घरात जळत असल्याचे शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व गल्लीतील महिलांना दिसले. त्यांनी तत्काळ धाव घेत कलाबाई यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. लोकांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचार सुरु असताना दुपारी दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेत त्या ९५ टक्के जळाल्या होत्या.कलाबाई यांचे पती शिक्षक होते. त्यांचे निधन झाले आहे. मुलगा जितेंद्र वकील तर दुसरा मुलगा विनोद यांचे जळगाव शहरात मेडिकल आहे. मुलगी विवाहित असून सासरी राहते. कलाबाई या कधी मुलांकडे तर कधी गावात रहायच्या. गावात त्यांची शेतीही आहे. मुलांकडून काही दिवसापूर्वीच त्या देवगाव येथे गेल्या होत्या. कोणाताही वाद नाही, आर्थिक अडचण नाही, तरीही त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नाही. सहायक फौजदार कैलास मारुमर्दाने तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावfireआग