एरंडोल येथील नाना नथ्थू पाटील हे एरंडोल येथील साखर व्यापाऱ्याचे सोयगाव, शेंदुर्णी, पहूर या भागांतून ७ लाख ९० हजार रुपये घेऊन वावडदामार्गे घरी परत जात असताना सात मार्च रोजी मध्यरात्री दोघांनी कार अडवून पाटील यांना मारहाण करून पैसे व कार घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मार्च महिन्यात अटक केलेल्या डासमाऱ्या याच्याकडून ४० हजार रुपये रोख व कार जप्त करण्यात आली होती. जास्त रक्कम तुकाराम याच्याकडे होती. त्यामुळे तो पंजाब व गुजरात राज्यांत मौजमजा करीत होता. तो भोपाळ येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी गणेश शिरसाळे, मुकेश पाटील व हेमंत पाटील यांना रवाना केले होते. या पथकाने सलग दोन दिवस सापळा रचून त्याला बुधवारी ताब्यात घेतले. तपासाधिकारी अमोल मोरे व रतीलाल पवार यांनी त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्या. ए.एस. शेख यांनी त्याला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी बाजू मांडली.
साखर व्यापाऱ्याचे पैसे लुटणाऱ्याला भोपाळमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST