महिंदळे येथील सुदाम परदेशी बनले ठाण्याचे उपजिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 12:19 PM2021-09-18T12:19:09+5:302021-09-18T12:19:52+5:30

भडगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Sudam Pardeshi from Mahindale became Deputy Collector of Thane | महिंदळे येथील सुदाम परदेशी बनले ठाण्याचे उपजिल्हाधिकारी

महिंदळे येथील सुदाम परदेशी बनले ठाण्याचे उपजिल्हाधिकारी

googlenewsNext



प्रमोद ललवाणी


कजगाव, ता.भडगाव, जि. जळगाव : महिंदळे, ता. भडगाव येथे शेतकरी कुटुंबातील सुदाम परदेशी आता ठाणे येथील उपजिल्हाधिकारी बनले आहेत. परदेशी यांच्या नियुक्तीने भडगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
एमबीबीएस करून डॉक्टर बनून ग्रामीण भागात जनतेची सेवा करावी, ही प्राजल भावना मनाशी होती, मात्र एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने राहुरी येथे बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी) चे शिक्षण घेतले. नंतर मन राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळले.
१९९५ मध्ये मंत्रालय सहाय्यक १९९६ विशेष लेखा अधिकारी १९९६ उपअधीक्षक, भूमि अभिलेख, १९९७ मध्ये तहसीलदार अशा पध्दतीने दोन वर्षात वेगवेगळ्या परीक्षातून निवड झाल्या. १९९८ मध्ये तहसीलदार या पदावर पुणे महसूल विभागात सुदाम परदेशी रुजू झाले. जुन्नर, कराड, दौंड येथे तहसीलदार म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. सन २००४/५ मध्ये कृष्णा कोयना नद्यांना आलेली पूरस्थिती, तद्नंतरची मदत या सर्व कामात उत्कृष्ट काम केल्याने उत्कृष्ट तहसीलदार म्हणून गौरविण्यात आले. २००८ मध्ये पदोन्नती होत विशेष भूसंपादन अधिकारी (उल्लास खोरे प्रकल्प) प्रसंगी भूसंपादनचे काम वेळेत पूर्ण केले. तद्नंतर उपविभागीय अधिकारी पनवेल, ठाणे येथे काम पाहिले. सन २०१७ / १८ या वर्षासाठी उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले
अशा पदोन्नतीने १३ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली.
ही वार्ता भडगाव तालुक्यात पोहचताच आनंदोस्तव साजरा करण्यात आला.
सुदाम परदेशी हे भडगावचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी यांचे सख्खे चुलत बंधू आहेत.

Web Title: Sudam Pardeshi from Mahindale became Deputy Collector of Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.