शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महिला सहाय्य कक्षाची यशस्वी शिष्टाई, ३५१ जोडप्यांची बहरली संसारवेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:30 IST

संशय, वाद दूर करून त्यांना एकत्र आणण्याची किमया स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय्य कक्षाच्या ‘खाकी’ तील शिलेदारांनी करून दाखविली आहे.

- सुनील पाटीलजळगाव : संशय, शंका, गैरसमज व कौटुंबिक कलह यामुळे संसारात मिठाचा खडा पडला अन् काडीमोडपर्यंत आलेल्या जिल्ह्यातील ३५१ जोडप्यांच्या मनातील संशय, वाद दूर करून त्यांना एकत्र आणण्याची किमया स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय्य कक्षाच्या ‘खाकी’ तील शिलेदारांनी करून दाखविली आहे.एकमेकांचे तोंड पाहणार नाही, तू माझ्या डोळ्यासमोर नकोच असे म्हणणारे जोडपे एकमेकाला मिठी मारून तोंड गोड करत घरी एकत्रितपणे परतले. दु:खी मनाने आलेल्या या दाम्पत्यांच्या डोळ्यातून जेव्हा आनंदाश्रू तरळायला लागले तेव्हा ‘खाकी’ तील या शिलेदारांनाही आपल्या कामाचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले. दरम्यान, अखेरपर्यंत दोन्ही गटांची समजूत घालूनही यश न आलेल्या ३२८ प्रकरणात मात्र पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले.महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या ४९८ या कलमाचा अनेक प्रकरणात महिलांकडून गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्याआधी पोलिसांकडून अशा प्रकरणात दोन्हीकडील म्हणणे ऐकून घेत समजोता घडवून आणण्याचे निर्देश असल्याने प्रत्येक जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र महिला सहाय कक्षाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात महिला सहाय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.शिफारशीनंतर होतो गुन्हा दाखलजळगाव येथील महिला सहाय कक्षात सहायक फौजदार अन्नपूर्णा बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल वंदना आंबिकार, सविता परदेशी, वैशाली पाटील व शैला धनगर या पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाकडे दाखल असलेल्या प्रकरणात पती-पत्नीसह दोन्हीकडील कुटुंबाना एकत्र बोलावण्यात येते. त्यांच्यात समजूत घालून गैरसमज दूर केले जातात. ज्या प्रकरणात तडजोड शक्यच नाही किंवा कोणी दोषी आढळत असेल तर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची शिफारस या कक्षाकडून केली जाते. त्यांच्या शिफारसीनंतरच गुन्हा दाखल होतो, मात्र या दोषी नसलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही, त्यामुळे कायद्याचा दुरुपयोग टाळला जातो. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या नियंत्रणात या शाखेचे कामकाज चालते. पोलीस अधीक्षक दर महिन्याला आढावा घेतात.चिमुरड्यांमुळे आयुष्याला कलाटणीअनेक प्रकरणांमध्ये दाम्पत्याला मुलबाळ झालेले असताना त्यांचा त्याग करुन अनेक जण घटस्फोटाची तयारी ठेवतात. अशा प्रसंगात महिला सहाय कक्षातील पथकाकडून काही घटनांचे बोलके उदाहरणे दिली जातात. त्यातून होणारे चांगले व वाईट परिणाम दृष्यस्वरुपात बघावयास मिळाल्यामुळे काडीमोड घेणारे दाम्पत्य दोन पावले मागे येतात व तेथेच या दाम्पत्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते.वृद्ध आई, वडिलांची फरफट...न्यायासाठी आलेल्या पती-पत्नींची समजूत घालताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. किरकोळ कारणे व गैरसमजुतीतून वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे पती-पत्नी तर वेगळे राहतातच, परंतु त्याचा फटका त्यांच्या निष्पाप बालकांनाही बसला आहे. काही प्रकरणात वृद्ध आई, वडिलांची फरफट झालेली आहे, असे निरागस चेहरे पाहून अंतकरण भरुन येते व त्यातून अश्रू आवरणे कठीण होते. मात्र अशा संवेदनशील प्रकरणात कुटुंब एकत्र आणण्यात यश येते तेव्हा आपोआपच आनंदाश्रू तरळतात, असे अनुभव या कक्षाच्या अन्नपूर्णा बनसोडे यांनी सांगितले.असे आहेत पती-पत्नीचे दाखल प्रकरणे (जानेवारी २०१७ ते जुलै २०१८)एकूण - १८३९समजोता - ३५१गुन्हे दाखल - ३२८न्यायालय - २९१अर्ज निकाली - ४२८प्रलंबित - ४४१समझोता करण्यासाठी आलेल्या प्रकरणांमध्ये ब-याच वेळा हाणामारीचे प्रसंग घडले आहेत. सासू-सास-यांपासून वेगळे रहाणे, मुलीच्या आईचा नको तितका हस्तक्षेप यामुळे वादाचे प्रसंग घडल्याचे प्रकरणे अधिक आहेत. अनेक कुटुंबाच्या वादाला मोबाईल हे एक मोठे कारण आहे. त्यातून गैरसमज होऊन टोकाचे मतभेद झाले आहेत. प्रत्येक सासूने सुनेला मुलीसारखे तर सुनेने सासूला आई मानले तर बहुतांश वाद जागेवर मिटतील.-अन्नपूर्णा बनसोडे, सहायक फौजदार, महिला सहाय कक्ष

टॅग्स :Jalgaonजळगाव