शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

आवर्तनाचा ९० कि.मी.चा सफल प्रवास!

By admin | Updated: April 10, 2017 00:42 IST

पाटबंधारे विभाग : १०० गावांना फायदा!

धुळे : पाणीटंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून नदीपात्रात सोडलेले आवर्तन १३ दिवसांच्या प्रवासानंतर ९० कि.मी. अंतरावरील आपल्या इच्छित स्थळी पोहचले. त्यामुळे पाणी सोडण्यामागील उद्देश सफल करण्यात पाटबंधारे विभागाला बºयाच वर्षात यश लाभले.  शिंदखेडा तालुक्यातील बेटावद, पढावद ही गावे पार करून पाणी भिलाणे दिगर गावाच्या के.टी.वेअर बंधाºयापर्यंत पोहचले. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तीन दिवसांपूर्वी त्यांनी आवर्तनाचे पाणी गावाच्या बंधाºयापर्यंत पोहचविण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्या बंधाºयापर्यंत पाणी पोहचले. तेथून पुढे तीन कि.मी. अंतरावर संगमावर पांझरा नदी तापी नदीला मिळते. या आवर्तनामुळे धुळे व शिंदखेडा  व अमळनेर तालुक्यातील मिळून १०० पेक्षा जास्त गावांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा झाला. यंदा आवर्तन सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून इतर विभागांशी समन्वय ठेवून नदीपात्रातील १९ बंधाºयांच्या फळ्या काढण्यात आल्या. त्यानंतरच आवर्तन सोडण्यात आले होते. २०० दलघफू एवढे पाणी सोडण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात १३ दिवसांत ३१० दलघफू एवढे पाणी सोडण्यात आले. त्यामुळेही आवर्तनास बळ मिळाल्याने ते वेगाने पुढे जात राहिले. त्यामुळे मार्गातील सर्व गावांना पाणी मिळाले. अक्कलपाडा प्रकल्पात आवर्तन सोडण्यापूर्वी ५५० दलघफू एवढा मृतसाठा शिल्लक होता. त्यामुळे आता केवळ १५० दलघफू एवढा मृतसाठा शिल्लक आहे. अक्कलपाडा आवर्तनाच्या दोन दिवस आधी शिंदखेडा तालुक्यातील वाडीशेवाडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले होते. शुक्रवारी ते शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेच्या कुरुक्षेत्र विहिरीपर्यंत पोहचले होते.