शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष चौकात सैनिक आणि पोलिसात दे दणादण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:02 IST

गुन्हा दाखल नाही : विना क्रमांकाची दुचाकी अडविल्याच्या कारणावरुन पडली वादाची ठिणगी

जळगाव : दुचाकी अडविल्याच्या कारणावरुन शनी पेठ पोलीस स्टेशनचा कर्मचारी आणि सैन्य दलातील जवान यांच्यात बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता सुभाष चौकात वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. पोलिसाला मारहाण होत असल्याचे पाहून इतर पोलिसांनी धाव घेऊन या जवानाची चांगलीच धुलाई केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एक सैन्य दलातील जवान बुधवारी दुचाकी घेऊन पासींगसाठी आलेला होता. आरटीओ कार्यालयात त्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो व त्याचा मित्र सायंकाळी सुभाष चौकात आले. परत जाताना सुभाष चौक पोलीस चौकीजवळ एका पोलिसाने विना क्रमांकाची दुचाकी पाहून चालकाला थांबविले. दुचाकी बºहाणपूर येथून घेतल्याचे त्यांच्याकडे कागदपत्रे होती, मात्र क्रमांक नसल्याने दोनशे रुपयाचा दंड लागले या कारणावरुन वाद झाला. तेथे दुचाकीस्वाराने शंभर रुपये घेऊन प्रकरण मिटवून टाका असे सांगितले, मात्र कर्मचारी दंडाच्या रकमेवर ठाम होता, त्यामुळे मागे बसलेल्या सैनिकाने पोलिसाची कॉलर पकडली. त्यात वाद वाढल्याने दोघांनी एकमेकाच्या कानशिलात लगावली. नंतर दोघांमध्ये हाणामारी झाली.सैनिक असल्याने कारवाई टाळलीहे प्रकरण पाहून इतर पोलीस धावून आले. सैनिकाला जागेवरच चोपून काढत पोलीस ठाण्यात आणून पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासमोर उभे केले. तेथे हा तरुण सैन्यात असल्याचे स्पष्ट झाले. ससे यांनी दोन्हीकडील बाजू ऐकून घेत. सिमेवर देशसेवा करीत असल्याची जाणीव ठेवून गुन्हा दाखल केला नाही. समज देवून या सैनिकाला सोडून दिले. हा सैनिक दिवाळीच्या सुटीवर आलेला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव