शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

जळगाव निरीक्षण गृहातील वैशालीचे थाटात शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 17:31 IST

संचालकांनी केले कन्यादान : अधीक्षिका बनल्या आई-मावशी

 जळगाव,दि.4- वडिलांचे छत्र हरविलेल्या अमळनेर येथील मूळ रहिवासी व जळगावातील बाल निरीक्षण गृहात वाढीस लागलेल्या वैशाली दहीवदकर या अनाथ मुलीचे 4 मे रोजी थाटात शुभमंगल झाले. मुली ओङो वाटत असणा:या या काळात पालकत्व नसलेल्या मुलीचा एवढय़ा थाटात विवाह पाहून जळगावकर मान्यवरांनी या विवाह सोहळ्य़ाचे कौतुक केले. 

वडिलांचे निधन झाल्यानंतर वैशालीच्या आईलाही मानसिक धक्का बसला व ती कोणालाही ओळखत नसल्याने नऊ वर्षाची असल्यापासून पालकत्व हरविलेल्या वैशालीचा गुरुवारी यावल तालुक्यातील चितोडा येथील दीपक सुभाष पाटील या मुलाशी विवाह झाला. सुभाष हा नाशिक येथे व्यवसाय करतो. 
4 रोजी सकाळी 9 वाजता भास्कर मार्केटनजीकच्या बाल निरीक्षणगृहात वैशालीला हळद लागली. त्यानंतर  लग्न घटिका समीप येत गेली व ज्या क्षणासाठी सर्वाचा उत्साह दिसून येत होता तो क्षण आला व दुपारी एक वाजेच्या सुमारास वैशालीचे लग्न लागले. 
आशीर्वाद देण्यासाठी रिघ
लग्न लागल्यानंतर नवदाम्पत्यास आशीर्वाद देण्यासाठी मान्यवरांची रिघ लागली होती. या वेळी आमदार सुरेश भोळे यांनी विवाहस्थळी हजेरी लावून वधू-वरास आहेर देऊन आशीर्वाद दिले. या सोबतच बाल व निरीक्षण गृह संचालक मंडळ, अधीक्षक, जिल्हा महिला बालविकास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, बालकल्याण समिती पदाधिकारी यांच्यासह सामाजिक संस्था, शहर व परिसरातील मान्यवरांनी हजेरी लावून विविध वस्तू भेट दिल्या. 
आत्मीयता, आपुलकीचे दर्शन
हा विवाह अनाथ मुलीचा आहे, असे येथे आल्यानंतर कोणालाही वाटत नव्हते.  सर्वजण अत्यंत आत्मीयतेने व आपुलकीने वैशालीच्या विवाहासाठी राबत होते व येणा:यांचे स्वागत करीत होते.  
संचालकांनी केले कन्यादान
लग्न लागल्यानंतर आशीर्वाद देण्यासाठी येणा:यांची संख्या मोठी होती. त्यामुळे जवळपास एक ते दीड तास मान्यवरांचे येणे-जाणे सुरूच होते. त्यानंतर वैशालीचे कन्यादान करण्यात आले. संचालक उमेश पाटील यांनी हे कन्यादान केले. 
आई-मावशीची उणीव भासू दिली नाही
मुलीची आई अथवा मावशी नसल्याची उणीव येथे भासू दिली नाही. अधीक्षिका जयश्री पाटील या वैशालीच्या आई तर सारिका मेतकर या मावशी झाल्या होत्या.