शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गटारीच्या पाण्यातून मार्ग काढत वराडसीम येथील विद्यार्थ्यांनी गाठली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:30 IST

शाळेत पहिल्याच दिवशी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याचे विविध उपक्रम राबवून सर्वत्र स्वागत होत असतांना भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील जि.प. शाळेत मात्र विपरीत चित्र दिसले. गावातील गटारींमधून वाहून आलेल्या घाण पाण्यातून कसरत करीत मार्ग काढीत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागली. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि संबंधीतांच्या अनास्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आला विदारक अनुभवसमस्येकडे दूर्लक्ष केले जात असल्याबद्दल पालकांचा संतापसर्वच शिक्षक बदलून आल्याने समस्येविषयी अनभिज्ञ असल्याची चर्चा

आॅनलाईन लोकमतवराडसीम, ता. भुसावळ : विद्यार्थ्याना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आनंददायक शिक्षणाचा एक भाग म्हणून शाळेत पहिल्याच दिवशी येणाºया विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके- वह्या देऊन तसेच मिठाई खाऊ घालून त्यांचे स्वागत केले जाते.यासाठी शालेय परिसर सजवला जातो. बैलगाडी, घोडागाडीवरून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूकही काढली जाते. शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र विद्यार्थ्याचे असेच स्वागत झाले. भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील जि.प. शाळेतही विद्यार्थ्याच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. परंतु तत्पूर्वी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश करतांना प्रवेशद्वारापासूनच कसरत करावी लागली. गावातील गटारींमधून वाहून आलेल्या घाण पाण्यातून मार्ग काढून शाळा गाठावी लागल्याच्या प्रकार घडल्यामुळे पालकवर्गात संताप व्यक्त करण्यात आला.गेल्या चार पाच वर्षांपासून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच गावातील गटारींचे अधूनमधून घाण पाणी वाहून येत असते. मात्र ग्रामपंचायतीचे याकडे सर्रास दूर्लक्ष झाले असून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने ही समस्या कायम आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी ही समस्या ठळकपणे निदर्शनास आल्याने संतापात भरच पडली होती.्नग्रामपंचायत प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही दूर्लक्ष केले जात असल्याचे पालकांसह ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची पालकांकडून मागणी होत आहे. येथे जि.प.च्या पहिली ते चौथीचे चार वर्ग असून ९५ च्यावर विद्यार्थी आहेत, तर अंगणवाडीचे पाच वर्ग असून दिडशे पर्यंत विद्यार्थी आहेत. यंदा या शाळेवर सर्वच शिक्षक बदलून आले असून ते या समस्येविषयी अनभिज्ञ असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Schoolशाळा