शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोराने दगड मारुन फेकल्याने जळगावात विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 17:50 IST

सेंट लॉरेन्स शाळेतील घटनेत डोळ्याजवळ दगड लागल्याने विद्यार्थी जखमी

ठळक मुद्देखिडकीजवळ बसलेल्या विद्यार्थ्याला लागला दगडशाळा प्रशासन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेणार शोधटवाळखोर निष्पन्न झाल्यास पोलिसांकडे देणार तक्रार

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि. २७ : वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना अचानक खिडकीतून दगड आल्याने त्यात श्रीकृष्ण रमेश रोटे (वय ६, रा.योगेश्वर नगर, जळगाव) हा सिनियर के.जी.चा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे बारा वाजता सेंट लॉरेन्स शाळेत घडली.पंचमुखी हनुमान मंदिरानजीक असलेल्या सेंट लॉरेन्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत श्रीकृष्ण रोटे हा विद्यार्थी सिनियर के.जी. या वर्गात शिक्षण घेत आहे. श्रीकृष्ण याची बसण्याची जागा खिडकीजवळ आहे. या खिडकीची काच फुटलेले आहे. वर्गात शिक्षक शिकवित असताना अचानक खिडकीतून दगड आला व तो थेट श्रीकृष्ण याच्या डोळ्याच्यावर भुईवर बसला. यात तो रक्तबंबाळ झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल करीत उपचार केले.या शाळेत सातत्याने दगड फेकण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप श्रीकृष्णचे वडील रमेश रोटे यांनी केला आहे. या खिडकीला काच राहिली असती तर श्रीकृष्ण याला दुखापत झाली नसती. काच बसविण्याचीही तसदी शाळेकडून घेतली जात नाही. दरम्यान, या घटनेबाबत रोटे यांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला असता दगड कोणी मारुन फेकला याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जातील व संबंधित व्यक्ती निष्पन्न झाल्यास पोलिसांकडे तक्रार करु अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :JalgaonजळगावSchoolशाळा