शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार प्रति तास २० मिनिटे अधिक वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 2:51 PM

परीक्षा केंद्रांन पत्र : लेखनिक घेण्यासाठी परवानगी आवश्यक

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना १ नोव्हेंबरपासून सुरूवात झाल्या आहे़ परीक्षा काळात दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रतितास २० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्याबाबतच पत्रक विद्यापीठाकडून परीक्षा केंद्रांना पाठविण्यात आले आहे़ दर तासाला २० मिनिटे म्हणजेच ३ तासांच्या परीक्षेसाठी ६० मिनिटे अर्थात एक तास अतिरिक्त वेळ देण्याच्या सूचना केल्या आहेत़दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये काही सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय प्रसिध्द केला होता़ त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सोयी-सवलतींच्या दृष्टीने नियमावली तयार करणेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठद्वारा एक समिती गठीत करण्यात आली होती़ नंतर समितीने केलेल्या शिफारशी तसेच अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या नियमावलीस मागील वर्षी परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून मान्यता प्रदान करण्यात आली होती़लेखनिक उपलब्ध करून द्यादिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर सोडविण्यासाठी लेखनिक मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते़ त्यामुळे दिव्यांग विद्यार्थी हे परीक्षेसाठी लेखनिक घेतात़ मात्र, लेखनिक घेण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे़ तसेच महाविद्यालयाने सुध्दा लेखनिकांची यादी तयार करून गरजेनुसार त्यातून विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याचेही विद्यापीठाने कळविले आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव