शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ विद्यार्थी असणार अभियांत्रिकीच्या चतुर्थ वर्षासाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:44 IST

विद्यापीठाचा निर्णय : सीजीपीए पॅटर्ननुसार प्रवेशित विद्यार्थ्यांनासाठी सवलत

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमास सीजीपीए पॅटर्न (२०१२-१३) नुसार प्रवेशीत ज्या विद्यार्थ्यांच द्वितीय व तृतीय वर्ष मिळून १५ किंवा त्यापेक्षा कमी क्रेडीट बाकी आहेत असे विद्यार्थी सन २०१९-२० मध्ये चतुर्थ वर्षासाठी प्रवेशास पात्र राहतील असा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील काही अभियांत्रिकी महाविद्यालये डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठाशी सन २०१७-१८ पासून संलग्नित झाले आहेत. गतवर्षी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांची (तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांसह) सीजीपीए २०१२-१३ या अभ्यासक्रमाची तृतीय वर्षाची शेवटची बॅच होती़ त्यामुळे विद्यापीठाने या पॅटर्ननुसार प्रवेशीत विद्यार्थ्यांचे प्रथम व द्वितीय वर्ष मिळून १५ किंवा त्यापेक्षा कमी क्रेडीट बाकी आहेत. असे विद्यार्थी तृतीय वर्षाच्या वर्गास सन २०१८-१९ या वर्षी प्रवेशासाठी पात्र राहतील असा निर्णय घेण्यात आला होता़बुधवारी झाली परीक्षा व मुल्यमापन मंडळाची बैठकयंदा शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांची चतुर्थ वर्षाच्या वर्गाची शेवटची बॅच असणार आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बुधवारी बैठकीत चर्चा झाली आणि त्यामध्ये सीजीपीए पॅटर्न २०१२-१३ नुसार ज्या विद्यार्थ्यांचे द्वितीय व तृतीय वर्ष मिळून १५ किंवा त्यापेक्षा कमी क्रेडीट बाकी आहेत असे विद्यार्थी सन २०१९-२० मध्ये चतुर्थ वर्षासाठी प्रवेशास पात्र राहतील असा निर्णय घेण्यात आला. ही सवलत सीजीपीए पॅटर्न २०१२-१३ नुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये चतुर्थ वर्षाच्या प्रवेशासाठी लागू राहणार आहे़ सन २०१७ आणि २०१८ पॅटर्ननुसार प्रवेशीत विद्यार्थ्यांना एटीकेटीचे नियम अभ्यासक्रमात उल्लेख केल्या प्रमाणे लागू राहतील अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव