शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्यात कडकडीत बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 21:23 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पारोळा येथे आज सोमवारी जनता कर्फ्यूला सुरवात झाली. त्यास कडकडीत बंद ठेवून जोरदार प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट : आता दर सोमवारी कर्फ्यू, दुकानदारांचा प्रतिसाद

 लोकमत न्यूज नेटवर्कपारोळा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पारोळा येथे आज सोमवारी जनता कर्फ्यूला सुरवात झाली. त्यास कडकडीत बंद ठेवून जोरदार प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दर सोमवारी जनता कर्फ्यू लागू करून बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता.त्यानुसार सोमवारी सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. मेडिकल व कृषी केंद्र वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. काही दोन चार भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने सुरु होती. दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यु यशस्वी केला.बाजारपेठेसह महामार्गावरील हॉटेल व्यावसायिक, भाजीपाला दुकानदार, छोटेमोठे व्यावसायिक यांनी ही आपली दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यूमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. नागरिकांची तुरळक हजेरी वगळता सर्वत्र शुकशुकाट मात्र दिसून आला. जनता, दुकानदार हे स्वयंस्फूर्तीने दर सोमवारी असाच कडकडीत बंद पाळणार असल्याच्या भावना बोलून दाखवली.दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा वाढू लागला असून त्या पार्श्वभूमीवर, पारोळा येथे योग्यवेळी हे पाऊल उचलण्यात आल्याने त्याचे संपूर्ण तालुक्यातून स्वागत करण्यात येत आहे.

व्यापारीवर्गाने स्वयंस्फूर्तीने सोमवार कडकडीत बंद पाळला. आपापली दुकाने बंद ठेवून हा स्वयंस्फूर्तीचा बंद यशस्वी केला. याबद्दल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय यांनी व्यावसायिकांचे आभार मानलेत.बाजारपेठेत सराफ दुकानदार इतर दुकानदारांनी आपआपली दुकाने बंद ठेवून कोरोनावर चर्चा करताना दिसून आली. काही व्यापाऱ्यांनी कोरोना आजाराने दुनियादारी शिकविल्याचेही मान्य केले.

बसस्टँड व रिक्षा स्टॉप, खाजगी कालिपिल्या, वाहन थांब्यावर मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात होती. बँकामध्ये बऱ्यापैकी गर्दी पाहण्यास मिळाली. सोमवार जनता कर्फ्यु असल्याची माहिती ग्रामीण भागात गेल्याने ग्रामीण भागातून लोक आले नसल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळाcorona virusकोरोना वायरस बातम्या