शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करणाऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:27 IST

न्यायालय : चाकूने खून करण्याचीही दिली होती धमकी

जळगाव : अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करुन आरोळ्या मारल्या तर चाकूने खून करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात न्यायालयाने श्रीकृष्ण रवींद्र पाटल (२१, रा.चिंचखेडा, ता.जामनेर) याला दीड वर्ष सक्त मजुरी व आठ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी सोमवारी हा निकाल दिला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, २६ सप्टेबर रोजी सकाळी साडे दहा वाजता पीडीत १५ वर्षीय बालिका घरी होती. शाळेत जाण्याची तयारी करीत असताना श्रीकृष्ण पाटील हा पीडितेच्या घरात आला. तिचे तोंड दाबून अश्लिल वर्तन केले नंतर आरोळ्या मारल्या तर चाकू खुपसून मारुन टाकेल अशी धमकी दिली. यावेळी पीडितेचा भाऊ आला असता तेव्हाही त्याने गैरवर्तन केले. दरम्यान, याप्रकरणी जामनेर पोलिसात विनयभंग व बाललैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.पीडितेची साक्ष ठरली महत्वपूर्णपोलीस उपनिरीक्षक माधुरी बोरसे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात अतिरिक्त सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी यांनी सहा साक्षीदार तपासले. घटनेचे महत्व व अशा कृत्यांना आळा बसावा व त्याचा संदेश समाजात गेला पाहिजे म्हणून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा युक्तीवाद अ‍ॅड.चौधरी यांनी केला. त्यात पीडित बालिकेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी याकामी मदत केली.दरम्यान, यातील दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव