शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

आजपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:49 IST

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ७ ते १३ जुलैदरम्यान जळगाव , भुसावळ, अमळनेर या शहरांमध्ये लॉकडाऊन राहणार असून यामुळे ...

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ७ ते १३ जुलैदरम्यान जळगाव, भुसावळ, अमळनेर या शहरांमध्ये लॉकडाऊन राहणार असून यामुळे वाढती रुग्णसंख्या रोखता येण्यास मदत होईल. नागरिकांनी याचे स्वयंशिस्तीने पालन करीत ‘जनता लॉकडाऊन’ म्हणून त्याची अंमलबजावणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.दरम्यान, बाहेर फिरण्यावर निर्बंध आणण्यासाठी नागरिकांवर आता ड्रोनचीही नजर राहणार असून जे नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता याला आळा बसण्यासाठी ७ ते १३ जुलै दरम्यान जळगाव, भुसावळ, अमळनेर या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेत तसे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी या पूर्वीच दिले आहे. ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली, त्या वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या वेळी त्यांनी या लॉकडाऊनविषयी माहिती दिली.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण उपस्थित होते.लॉकडाऊन वाढणार नाहीकोरोना बाधितापासून होणारा प्रादुर्भाव रोखला जावा हा या लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश हा आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर नागरिक धास्तावून वेगवेगळ््या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करीत आहे. लॉकडाऊन आणखी वाढू शकते, या भीतीत नागरिक आहे. मात्र नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये, हे लॉकडाऊन केवळ सातच दिवस राहणार आहे, त्यात कोणतीही वाढ होणार नाही, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.पूर्व नियोजित लग्नसमारंभ होणारपूर्व नियोजित लग्नसमारंभ ५० व्यक्तींच्या मर्यादेत तर अंत्यविधी २० व्यक्तींच्या मर्यादेत करता येणार आहे. त्याचबरोबर दूध वाटप व औषधी दुकाने दिवसभर सुरू राहणार आहे. यामुळे तेथे गर्दी होणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आपल्या प्रभागातच पायी जावून दूध व औषधे खरेदी करता येणार आहे.वृत्तपत्रांचे घरोघर वितरण होणारलॉकडाऊन काळात केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, कृषी दुकाने, एमआयडीसीतील उद्योग तसेच वृत्तपत्रांची कार्यालये सुरू राहण्यासह वृत्तपत्रांचे घरोघर वितरणही सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.इतरांना इंधन दिल्यास कारवाई... अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांनाच पेट्रोलपंपावर इंधन उपलब्ध होणार आहे. पेट्रोल पंपचालकांनी इतरांना इंधनचे वाटप करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव