जळगाव : पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून असताना तेथील धंद्याचे ५३ हजार २५० रुपये लांबविणाºया सुंदरम अशोक पांडे (वय २४, रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) याला तालुका पोलिसांनी रविवारी अटक केली. न्या.एम.एम.चौधरी यांनी २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सुंदरम हा महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपावर (प्रिया फिलींग स्टेशन) येथे व्यवस्थापक म्हणून कामाला असताना ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी त्याने दिवसभराचे धंद्याचे पैसै लांबविले होते. त्यानंतर तो उत्तर प्रदेशात पळून गेला होता. याबाबत संजय अमृतलाल मिश्रा (रा. दादावाडी, मुळ रा.उत्तर प्रदेश) याच्या फिर्यादीवरुन १ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण व त्यांच्या पथकाने सुंदरम याला उत्तर प्रदेशातून अटक केली. रविवारी न्या. एम. एम. चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड.रंजना पाटील यांनी काम पाहिले.
पेट्रोल पंपावरील पैसे लांबविणाऱ्या मॅनेजरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:49 IST
२३ पर्यंत पोलीस कोठडी
पेट्रोल पंपावरील पैसे लांबविणाऱ्या मॅनेजरला अटक
ठळक मुद्देउत्तर प्रदेशातून केलीअटक