शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची घुसमट बंद करा, मासूची राज्यपालांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 19:51 IST

जळगाव : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना उद्भवलेल्या अडचणी, समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी राज्यपालांनी आपल्या अधिकारांच्या अंतर्गत निर्णय घेऊन ...

जळगाव : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना उद्भवलेल्या अडचणी, समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी राज्यपालांनी आपल्या अधिकारांच्या अंतर्गत निर्णय घेऊन विद्यार्थ्यांची घुसमट बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्यावतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील जनतेचे अतोनात हाल होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली आहे. याची झळ शहरी व ग्रामीण या दोन्ही भागांना पोहचलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाने आकारलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना सरसकट परत करावे व शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश शुल्कामध्ये सूट मिळावी व इतर कुठलेही शुल्क न आकारता फक्त शिकवणी शुल्क आकारून त्यासाठी मासिक हप्ते प्रदान करण्यात यावे, अशी मागणी मासूच्या शिष्‍टमंडळाने केली. तसेच ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्येमुळे निर्माण झालेली डिजिटल विभागणी बंद करावी तसेच ऑनलाईन परीक्षेत उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी तात्काळ स्वरुपात दूर कराव्यात, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी मासूचे संस्थापकअध्यक्ष अ‍ॅड.सिद्धार्थ इंगळे, उपाध्यक्ष सुनील देवरे, सचिव प्रशांत जाधव, अनिरुद्ध मोरे, सिद्धार्थ तेजाळे आणि कायदेशीर सल्लगार अ‍ॅड.दीपा पुंजानी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव