शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हे (पानाचे) येथे सीसीआय केंद्रासमोर   शेतकऱ्यांचा दोनदा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 20:45 IST

कुऱ्हे  (पानाचे ) येथील सुशिला जिनिंग प्रेसिंगसमोर कापसाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी दोन वेळेस रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देकापसाच्या गाड्या आठ दिवसांपासून पडून;  शेतकरी संतप्तसहायक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांच्या मध्यस्थीने मिटवला वाद

 भुसावळ : तालुक्यातील कुऱ्हे  (पानाचे ) येथील सुशिला जिनिंग प्रेसिंगसमोर कापसाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी दोन वेळेस रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.    कुऱ्हे  (पानाचे) येथे दोन जिनिंगमध्ये कापूस खरेदी केंद्र  सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस कापूस मोजण्यात आला. मात्र गेल्या आठवड्यातून फक्त गुरुवार व शुक्रवार असे दोनच दिवस कापसाची खरेदी होत होती. त्यातही गुरुवारी खरेदी बंद असल्याने आठवड्यातून एकच दिवस कापसाची खरेदी होत असल्याने एका दिवसात एवढा कापूस कसा मोजला जाईल, असा प्रश्न उपस्थित झाला.आठ दिवसापासून येथे शेतकऱ्यांनी कापूस मोजणीसाठी आणला आहे.  मात्र गुरुवारी निराशा  झाली. दुपारपर्यंत केंद्रप्रमुखाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी अखेर एक वाजता कापसाच्या भरलेल्या वाहनांना भुसावळ-जामनेर रस्त्यावर उभे कले व व  रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी  बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित वाहनांना टोकन देऊन कापूस मोजला जाईल,  असे आश्वासन दिले व आंदोलन तात्पुरते मागे घेतले.  मात्र चार वाजेपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने कापूस खरेदी केली नाही. त्यामुळे पुन्हा आठवडाभर थांबावे लागेल का, या विचाराने शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन  करत कापसाच्या भरलेल्या वाहनांना रस्यांवर उभे केले व  केंद्रप्रमुखाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आज  तालुक्यातील कापूस खरेदीचा दिवस असून केंद्रप्रमुख जामनेर तालुक्यातील केंद्रावर थांबून जामनेर तालुक्यातील कापसाची वाहणे मोजत होते. त्यामुळे केंद्रप्रमुखांचे भुसावळ तालुक्यापेक्षा जामनेर तालुक्यावर अधिक प्रेम असल्याचे दिसत होते. ते  कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित झाला. 

शेतकऱ्यांच्या मागण्याकापसाची नियमित व दररोज खरेदी करावीटोकन देताना जे वाहन अगोदर आले त्यांना टोकन द्यावे येथे व्यापाऱ्यांना टोकन विक्री होत असल्याची तक्रार आहेचांगल्या प्रतीच्या कापसाला कोणतीही कपात/कट्टी लावू नये नाव नोंदणी कापूस खरेदी केंद्रावरच केली जावी मोजलेल्या कापसाची पावती त्याच दिवशी खरेदी केंद्रावरच देण्यात यावी

सहायक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण यांच्या मध्यस्थीने मिटवला वादशेतकऱ्यांनी भुसावळ-जामनेर रस्त्यावर सुशीला जिनिंगजवळ रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे शेकडो वाहने रस्त्याच्या दुतर्फा लागलेली होती. याची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनच्ळा सपोनि रुपाली चव्हाण, अमोल पवार, युनुस शेख व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला शांत करत मध्यस्थी केली. शेतकऱ्यांनीसुद्धा तक्रारीचा पाढा सपोनि चव्हाण यांच्या पुढे मांडला. कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन करीत संबंधित अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधना व  त्यांना तत्काळ कापसाची खरेदी करण्यास सांगितले. त्यामुळे केंद्रप्रमुख यांच्या प्रमुख कर्मचाऱ्यांनी सुशीला जिनिंग गाठून शेतकऱ्यांचे भरलेल्या बैलगाड्यांमधील कापसाची खरेदी करण्यास संध्याकाळी सुरुवात केले. त्यामुळे हा वाद अखेर मिटला. 

आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनेच विचार करीत आहोत. त्यांचा रोष आम्ही समजू शकतो.  जामनेर तालुक्‍यात तीन ते चार दिवस कापसाची मोजणी केली जाते. परंतु आपल्या भुसावळ तालुक्यात फक्त एक किंवा दोनच दिवस कापसाची मोजणी होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठ पातळीवर केली जाईल  व आठवड्यात नियमीत कापसाची खरेदी व्हावी यासाठी पाठपुरवठा करीत आहे. 

-नितीन पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती,  भुसावळ 

आमचे ही वाहने आठ दिवसापासून खरेदी केंद्रावर असून आम्हाला आठ दिवसानंतर आज टोकन पावती दिली. तरीसुद्धा वाहने मोजणी झाले नाही. शासनाने वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन केंद्र प्रमुखाचा मनमानी कारभार थांबावा, आठवडाभर दररोज वाहने मोजणी करावी. यासाठी आंदोलन केले. -अतुल पाटील, शेतकरी 

टॅग्स :agitationआंदोलनBhusawalभुसावळ