शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा दूध संघातील बँकेत दगड टाकून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:07 IST

जिल्हा दूध संघाच्या आवारातील जिल्हा बॅँकेच्या शाखेत चोरट्यांनी प्रवेश करीत दगडांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात चोरट्यांना तिजोरीचे फक्त हँडल तोडण्यात यश आले,तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने त्यातील साडे पाच लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. सोमवारी सकाळी १०.४५ वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

ठळक मुद्दे तिजोरी न फुटल्याने साडे पाच लाख सुरक्षित   चोरट्यांनी सुरक्षेचे काढले वाभाडे सीसीटीव्ही कॅमेराही फोडला

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१६ : जिल्हा दूध संघाच्या आवारातील जिल्हा बॅँकेच्या शाखेत चोरट्यांनी प्रवेश करीत दगडांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात चोरट्यांना तिजोरीचे फक्त हँडल तोडण्यात यश आले,तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने त्यातील साडे पाच लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. सोमवारी सकाळी १०.४५ वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.   

दोन दिवस बँक बंद होती, उघडताच चोरी झाल्याचे समजले जिल्हा दूध संघाच्या आवारातच जिल्हा बॅँकेची शाखा आहे. शनिवार व रविवार दोन दिवस बॅँकेला सुटी होती. त्यामुळे सोमवारीच ही बॅँक उघडली. शाखा व्यवस्थापक लक्ष्मण हेमचंद्र भोळे, त्यांचे सहकारी सकाळी १०.४५ वाजता बॅँकेत आले असता मुख्य दरवाजाचे कुलूप कडीसह तुटलेले होते तर आतमधील कपाट उघडे होते व तिजोरीचे हॅँडल तुटलेले होते. तेथेच सिमेंटचे दगड पडलेले होते. बॅँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर शाखा व्यवस्थापक भोळे यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.

सर्वात आधी कॅमेरा फोडलाचोरट्यांनी बॅँकेत प्रवेश करण्यापूर्वी खबरदारी म्हणून  सर्वात आधी समोरच्या भिंतीवर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. दोरीच्या सहाय्याने किंवा दगडाने हा कॅमेरा फोडण्यात आला असावा. भिंतीच्या शेजारी असलेल्या मेहंदीच्या झुडपात हा कॅमेरा आढळून आला. बॅँक व्यवस्थापकांनी तो बॅँकेजवळ आणला. आतमध्ये लोखंडी कपाटाचे कुलूप तोडण्यात आले आहे. या कपाटात कागदपत्रे असल्याने चोरट्यांना तेथे काहीच हाती लागले नाही.

सुरक्षा रक्षक असताना चोरीदूध संघात कडक सुरक्षा व्यवस्था असताना बॅँक फोडण्यात आली. त्यामुळे या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संघाच्या आवारात बांधकाम सुरु आहे, शिवाय रात्री दूध घेऊन जिल्हाभरातून वाहने येतात. रात्रभर वर्दळ सुरु असताना चोरीचा प्रयत्न झाला आहे,हे विशेष. 

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा