शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुपारचा वाद मिटवताना रात्री जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या घरावर दगडफेक

By विजय.सैतवाल | Updated: May 11, 2024 00:44 IST

मोहाडी रस्त्यावर रात्रीचा थरार; कारच्या काचा फुटल्या

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: तालुक्यातील मोहाडी येथे दुपारी दोन गटात झालेल्या वादाविषयी तडजोड करण्यासाठी रात्री दोन गट चर्चा करीत असताना पुन्हा वाद उफाळून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या व दरवाजाच्या काचा फुटल्या असून अपार्टमेंट परिसरातही दगडांचा खच पडला होता. ही घटना शुक्रवार, १० मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मोहाडी रस्त्यावरील इम्पेरियल या अपार्टमेंटमध्ये घडली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक तसेच क्यूआरटी पथक दाखल झाले होते. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. 

जळगाव शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी गावात अक्षय तृतीयेला पत्ते खेळण्याचा डाव सुरू होता. त्यावेळी दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. याविषयी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी काहीजण गेले. मात्र तक्रार न देता तेथून ते परत आले. यासंदर्भात दोन्ही गटात तडजोड करण्यासाठी त्यांना मोहाडीरोडवर पवन सोनवणे यांच्या घराजवळ बोलवण्यात आले.  मात्र या ठिकाणी दुपारच्या वादातून दोन गट पुन्हा एकमेकांना भिडले. तसेच त्यांनी शहरातील इतर भागातील काही तरुणांना देखील बोलवून घेतले. दोन गटातील हा वाद वाढत जाऊन संतप्त झालेल्या दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीमध्ये रस्त्यावर उभी असलेली सोनवणे यांच्या कारचे देखील नुकसान झाले.  तसेच पवन सोनवणे यांच्या घरावरदेखील दगडफेक करण्यात आली. त्यांच्या घराच्या गॅलरी आणि खिडकीचे काच फोडले गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. नाना तायडे, पोउनि गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, विजय पाटील व अन्य अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तसेच क्यूआरटीचे दोन पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. रात्री उशिरापर्यंत पोलिस ताफा या ठिकाणी तैनात होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव