जळगाव : घर मालक बाहेर गावी गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी शहरातील अशोक नगरमधील घरात चोरी केल्यची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.या बाबत मिळालेली माहिती अशी की, आयोध्यानगरजवळील अशोकनगरमधील रहिवासी किशोर नामदेव नारखेडे हे कुटुंबीयांसह पुणे येथे गेलेले आहे. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराची दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचील साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरी केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आला. त्या वेळी त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घर मालक नसल्याने नेमका किती ऐवज लंपास झाला, हे समजू शकले नाही.
जळगावात बंद घरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:30 IST