शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जळगावच्या विकास कामांसाठी राज्य शासन आणखी १०० कोटींंचा निधी देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 19:01 IST

सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत द्यावा लागणारा महापालिकेचा हिस्सा राज्य शासन उचलणार

ठळक मुद्देभविष्यातील पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता आतापासून पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनासमांतर रस्त्यांचा डीपीआर तयार करण्याबाबत सूचना

जळगाव : सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत जळगाव शहरात विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासन विशेष बाब म्हणून शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. या अभियानातंर्गत राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या ३० टक्के हिस्सा महापालिकेने देणे आवश्यक आहे. परंतु जळगाव शहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने महानगरपालिकेचा हिस्साही राज्य शासनच उचलेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.जळगाव शहर महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा सोमवारी येथील जिल्हा नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, खासदार ए. टी. पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, संजय सावकारे, शिरीष चौधरी, सुरेश भोळे, उन्मेश पाटील, चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासनाने शहरातील मुलभूत सुविधांच्या विकास योजना राबविण्यासाठी महापालिकेस यापूर्वीच २५ कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या निधीचा वापर करताना शहरातील मुलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. त्याचबरोबर सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत शहरातील रस्ते व गटारींची कामे करण्यासाठी राज्य शासन १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार आहे. या निधीतून शहरात करावयाच्या विकास कामांसाठी महासभेने लवकरात लवकर मान्यता देऊन सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा. या प्रस्तावास शासन तातडीने मंजूरी देईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या निधीतून शहरातील प्रमूख रस्त्यांची कामे हाती घ्यावीत. ही कामे करतांना अगोदर गटारीची कामे पूर्ण करावी व त्यानंतर रस्तयांची कामे करावी. शहरातील प्रमुख रस्ते हे डांबराऐवजी सिमेंट कॉक्रीटीकरणाची करावीत. शहरात अमृत अभियानातंर्गत पाणी पुरवठा योजना व मलनि:स्सारणचे काम सुरु आहे. हे काम सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करावेत तसेच शहरात हरित क्षेत्र निर्माण करताना पर्यावरण पूरक पाथ वे तयार करावेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) घरकुलांचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात आला आहे. तथापी, जळगाव शहर झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी शहरात किमान १० हजार घरे बांधण्याबाबतचे नियोजन करुन तसा प्रस्ताव शासनास सादर करा. भविष्यातील पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता आतापासून पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्यात. तसेच शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम, समांतर रस्त्यांचा डीपीआर लवकरात लवकर तयार करण्याबाबतही त्यांनी यंत्रणेला सूचना दिल्यात. त्याचबरोबर शहराच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी बैठकीत सांगितले.यावेळी महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी शहरातील विकास कामांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव