शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 00:37 IST

मध्य रेल्वे : जळगाव ते शिरसोली दरम्यान ११ लहान तर ३ मोठे पूल उभारणार

जळगाव : पहिल्या टप्प्यात भुसावळ ते भादली या तिसऱ्या मार्गाचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले असून भादली ते जळगाव या उर्वरित कामालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. तर आता जळगाव ते शिरसोली या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला पिंप्राळा गेटपासून नुकतीच सुरुवात झाली आहे. या साडेअकरा किलोमीटरच्या मार्गावर ११ लहान पूल व ३ मोठे पूल उभारले जाणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई ते दिल्ली या मार्गावर अप व डाऊन हे दोनच मार्ग असल्यामुळे या दोन्ही मार्गावर दर दहा मिनिटाला गाड्या धावत असतात. गाड्यांची वर्दळ लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने तीन वर्षांपूर्वी भुसावळ ते मनमाड या तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजूरी दिली होती. यापैकी भुसावळ रेल्वे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात भुसावळ ते जळगाव या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली . यामध्ये सुरुवातीला भुसावळ ते भादली य साडेअकरा किलो मीटरचे काम हाती घेतले होते. वर्षभरात हे काम पूर्ण करुन, भादली ते जळगाव या कामालाही लगेच सुरुवात करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, तरसोद, असोदा येथील शेतकऱ्यांना रेल्वेकडून पुरेसा मोबदला न मिळाल्यामुळे, हे काम थांबले होते. दरम्यान, गेल्या महिन्यात रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन, भादली ते जळगाव या उर्वरित मार्गाच्या कामालाही गेल्या आठवड्यात सुरुवात केली आहे.

दुसऱ्या टप्प्याच्या कामाला पिंप्राळा गेटपासून सुरुवात -गेल्या आठवड्यात जळगाव ते मनमाड या १६० किलो मीटरच्या तिसºया रेल्वे मार्गाचे रेल्वेचे उप मुख्य अभियंता रोहित थावरे व इतर अधिकाऱ्यांनी यांनी मोजमाप केले होते. मोजमाप केल्यानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवातदेखील झाली आहे. जळगाव ते शिरसोली या ११ किलोमीटरच्या मार्गावर ठिकठिकाणी ११ लहान पूल उभारले जाणार आहेत. तर मोठ्या आकाराचे ३ मोठे पूल उभारले जाणार आहेत. आधी पूलांची उभारणी केल्यावर, त्यानंतर रुळ टाकले जाणार आहेत.डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून, सध्या जेसीबीच्या सहाय्याने जमिन सपाटीकरणाचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यातही हे काम सुरु राहणार असून, भुसावळ येथील बी. एम. अग्रवाल व जळगाव येथील एम. एस. जैन या मक्तेदारांमार्फत या तिसऱ्या मार्गाचे काम करण्यात येत असल्याचे उप मुख्य अभियंता रोहित थावरे यांनी सांगितले.

शिरसोलीपर्यंत रेल्वेच्या हद्दीतच तिसरा मार्ग :भादली ते जळगाव या तिसºया मार्गाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडे पुरेशी जागा नसल्यामुळे, हे काम रखडले होते. मात्र, जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेच्या हद्दीत पुरेशी जागा असल्यामुळे, हा तिसरा मार्ग रेल्वेच्या हद्दीतच तयार केला जाणार आहे. तर शिरसोलीपासून पुढे पाचोऱ्यापर्यंत रेल्वेची हद्द सोडून, तिसºया मार्गासाठी लागणाºया जागेसाठी भूसंपादनाच्या कामाला रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच सुरुवात केली जाणार आहे.तिसऱ्या रेल्वेच्या कामाला पिंप्राळा गेटपासून सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला पुलांची उभारणी केली जाणार असून, त्यानंतर रुळ टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. जळगाव ते शिरसोली हा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. -रोहित थावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ