शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

घरी जायला निघाले, वाटेतच काळाची झडप! जळगावमध्ये कार व दुचाकी अपघातात एक जण ठार

By विजय.सैतवाल | Updated: July 13, 2024 23:46 IST

लग्नासाठी आलेल्या कारसोबत अपघात, खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: कार व दुचाकीचा अपघात होऊन नीलेश केशव बारी (४४, मूळ रा. शिरसोली, ह. मु. शास्त्रीनगर) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी (१३ जुलै)  रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रामदास कॉलनीत झाला.

मूळचे शिरसोली येथील व शेती करणारे नीलेश बारी हे सध्या कुटुंबियांसह गिरणा टाकी परिसरातील शास्त्री नगरात राहत होते. शनिवारी रात्री ते सागर पार्ककडून दुचाकीने घराकडे जात असताना रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीत  अचानक समोर एक कार आली व  दुचाकीस्वार नीलेश बारी हे कारवर धडकले. ते कारच्या दरवाजावरील काचवर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. ते बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.  त्याठिकाणाहून जाणाऱ्या एका तरुणाने जखमी बारी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी मयत घोषीत केले. 

कागदपत्रावरून पटली ओळख

नीलेश बारी यांच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. काही तरुणांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली. त्यानुसार बारी यांचे वडील व पत्नी रुग्णालयात पोहचले. यावेळी त्यांचा मृतदेह बघताच त्यांनी आक्रोश केला.

लग्नासाठी आलेल्या कारसोबत अपघात

अपघातानंतर दुचाकी धडकलेला कारचालक रुग्णालयात दाखल झाला. त्या कारमधील नागरिक अहमदनगर येथील असून ते जळगावात पुतण्याच्या लग्नासाठी आले होते. त्याठिकाणी जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू