शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

भुयारी गटारीच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:13 IST

३०० ते ४०० कर्मचारी कार्यरत : पहिल्या टप्प्यात १४३ किमीची पाईपलाईन

जळगाव : अमृत योजनेंंतर्गत जून २०१७ मध्ये मंजूर झालेल्या मलनिस्सारण योजनेच्या पहिल्या टप्प्याचा कामासाठीच्या निविदेला तब्बल दोन वर्षांनंतर मंजुरी मिळाली़ त्यानंतर शिवाजीनगरातून भुयारी गटारीच्या कामाला अखेर शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात १४३ किमीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.मलनिस्सारण योजनेतील झोन क्रमांक १ मधील मलवाहिन्या टाकण्याच्या कामास या प्रभागातील नगरसेवक अ‍ॅड़ दिलीप पोकळे, नगरसेविका सरिता नेरकर, प्रिया जोहरे, नगरसेवक नवनाथ दरकुंडे, नगरसेविका रुखसानाबी खान यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. दिलीप पोकळे व नवनाथ दारकुंडे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे खड्डे बजविल्याशिवाय भुयारी गटारींचे काम करु देणार नाही अशी भूमिका सुरुवातील घेतली होती. मात्र, रस्ते दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर कामाचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी हसमुख पटेल, दर्शन नाकरानी, महानगरपालिकेचे प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता एम. बी. चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान,शहरात मलनिस्सारण योजनेची एकुण लांबी ६४५ किमी इतकी असून, पहिल्या टप्प्यात १४३ तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ५०१ किमीचे काम होणार आहे. जर गरज पडल्यास तिसºया टप्प्याचा वापर होणार आहे. मलनिस्सारण योजना ही नवीन एसबीआर तंत्रज्ञानाने होणार आहे. या कामादरम्यान राष्टÑीय महामार्गालगत ९ ठिकाणी क्रॉसींग होणार आहे. तर रेल्वे लाईनला २ ठिकाणी क्रॉसींग होणार आहे. तर ९ ठिकाणी महामार्गाला संमातर या योजनेचे काम होणार आहे. मलनिस्सारणच्या कामासाठी १५० ते ५०० एमएमचे, मुख्य मलनिस्सारणच्या गटारीसाठी ६०० ते १४०० एमएमच्या पाईपचा वापर केला जाणार आहे.सेफ्टी टॅँकची गरज नाहीनव्याने तयार होणाºया भुयारी गटारीमधून घरगुती सांडपाणी व मलनिस्सारण केले जाणार आहे. तर सध्या असलेल्या गटारींचा वापर दोन वर्षानंतर केवळ पावसाच्या पाण्यासाठी केला जाणार आहे. मलनिस्सारण योजनेमुळे भविष्यात घरांचे बांधकाम तयार करताना नागरिकांना सेफ्टी टॅँक बांधण्याची गरज पडणार नाही. कारण घरातील सर्व मैला भुयारी गटारीद्वारे एका मलनिस्सारण केंद्राच्याठिकाणी जमा होईल. यासाठी तीन प्रक्रिया केंद्र तयार केली जाणार आहे. तसेच शिवाजी नगरभागात मुख्य मलनिस्सारण प्रकल्प तयार करण्यात येणार असून या ठिकाणी प्रक्रिया होवून खत तयार करण्यात येणार आहे. तर पाण्याचा वापर शेतीसाठी देखील करता येणार आहे.टेलिकॉम कंपन्यांना आवाहनभुयारी गटारीसाठी खड्डे खोदत असताना जमिनीत असलेल्या खाजगी टेलीकॉम कंपनीच्या केबल तुटू नये यासाठी संबंधित टेलीकॉम कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे़पहिल्या टप्प्यात या भागात कामपहिल्या टप्प्यात १४३ किमी होणाºया कामात शहरातील दुध फेडरेशन, इंद्रप्रस्थनगर, खडके चाळ, शिवाजी नगर, रेल्वे स्टेशन पासून कांचन नगर, शंकर अप्पा नगर, ज्ञानदेव नगर, कालिंका माता चौक, अजिंठा चौक, मेहरूण, मोहाडी रोड, मोहन नगर, गणपती नगर, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक व नेहरू चौक पर्यंतच्या येणाºया सर्व मधल्या भागात पहिल्या टप्प्याचे काम होणार आहे.खोदकामानंतर रस्ता तत्काळ पूर्ववत करणारया कामासाठी मक्तेदाराचा ३००-४०० कुशल कामगार कार्यरत आहे. सदर काम करताना काम झाल्यावर तात्काळ रस्ता पूर्ववत करणेची व्यवस्था मकेतदाराने केली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव